तिसवाडी : सिद्दीकी पलायन प्रकरणातील बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईक गोमेकॉत उपचारार्थ दाखल

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
15th December, 03:18 pm
तिसवाडी : सिद्दीकी पलायन प्रकरणातील बडतर्फ कॉन्स्टेबल अमित नाईक गोमेकॉत उपचारार्थ दाखल

पणजी :  जमीन घोटाळ्याप्रकरणी गुन्हा शाखेच्या कोठडीत असलेला आरोपी सिद्दीकी सुलेमानला कोठडीतून पळून जाण्यात मदत करणाऱ्या बडतर्फ आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईकला उपचारार्थ गोमेकॉत दाखल करण्यात आले आहे. प्राप्त माहितीनुसार उत्तर गोवा पोलीस अधीक्षक व उपअधीक्षक सुदेश नाईक यांनी संशयिताची चौकशी केली आहे. 


 

दरम्यान आयआरबी कॉन्स्टेबल अमित नाईक शुक्रवारी रात्री हुबळी पोलिसांना शरण आला होता. शनिवारी त्याला सेवेतून बडतर्फ करण्यात आले. एकंदरीत प्रकरणावर काल सकाळी गोव्याचे पोलीस महासंचालक आलोक कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. या वेळी त्यांनी गुन्हे शाखेच्या कोठडीतून पळून गेलेला सिद्दीकी सुलेमान खान हा कर्नाटकातच कुठेतरी लपला असावा अशा संशय व्यक्त केला. गोवा पोलिसांच्या पथकांकडून युद्धपातळीवर शोधमोहीम सुरू असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. कालच रात्री सिद्दीकी सुलेमानला हुबळीतून कारमधून पळून जाण्यास मदत करणार्‍या संशयित हजरतसाब बवन्नवार ऊर्फ हजरत अली (३४, रा. हुबळी) याला गुन्हे शाखा व जुने गोवे पोलीस पथकाने ताब्यात घेतले होते.  



बातमी अपडेट होत आहे.


हेही वाचा