म्हापसा : बस्तोडा येथील कोमुनिदाद व्यवस्थापन समितीची व्हिल्बर मिनेझिस यांच्या अध्यक्षपदाखाली बिनविरोध निवड झाली. अॅटर्नी सिडनी डिसोझा, खजिनदार लाझारस फर्नांडिस, उपाध्यक्ष जॉन मोनिझ, उप अॅटर्नी बेंजामिन डिसोझा व उप खजिनदार क्लिटंन डिसोझा यांचा या निवडून आलेल्या नुतन समितीमध्ये समावेश आहे.
आज रविवारी १५ डिसेंबर रोजी नुतन कोमुनिदाद समितीची निवड प्रक्रिया झाली. या पदासाठी वरील पदाधिकाऱ्यांचेच अर्ज सादर झाले. त्यामुळे समितीची बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक अधिकार्यांनी जाहीर केले. बार्देश उपजिल्हाधिकारी कार्यालयाचे अव्वल कारकून केशव भगत यांनी निर्वाचन अधिकारी म्हणून यावेळी कामकाज हाताळले. त्यांना कोमुनिदाद इस्किवांव गाब्रियल फर्नांडिस यांनी सहकार्य केले.