साहित्य :
२ मोठे चिरलेले कांदे, १ मोठा चिरलेला टोमॅटो, ४ ते ५ लसूण, २ ते ३ आल्याचे तुकडे, तेल, १ चमचा जिरे, १ मोठा चमचा गरम मसाला, १ चमचा धने पूड, लाल तिखट, १ चमचा बेसन, १ वाटी मटार, चवीनुसार मीठ, कोथिंबीर.
कृती :
प्रथम एका मिक्सरच्या भांड्यात मोठा चिरलेला कांदा, मोठा चिरलेला टोमॅटो, ४ ते ५ लसूण, २ ते ३ आल्याचे तुकडे घाला व छान बारीक वाटून घ्या. एका भांड्यात ४ ते ५ चमचे तेल तापत ठेवा. तेल तापलं की त्यात १ चमचा जिरं घाला. जिरं तेलात फुललं पाहिजे. मग यात कांदा व टोमॅटोचं वाटण घाला. यातलं पाणी जाईपर्यंत एकत्र ७ ते ८ मिनिटे बारीक गॅसवर ठेवा. आता यात सर्व मसाले घाला. जसे की १ मोठा चमचा गरम मसाला, १ चमचा धने पूड, लाल तिखट हे सर्व तेल सुटेपर्यत एकत्र करा. यात आर्धा चमचा बेसन घाला. याने या भाजीतला रस एका बाजूला होत नाही आणि १ ते २ मिनट परतून घ्या. आता यात मटार घाला आणि २ ते ३ मिनिटे मटार वाफवून घ्या. तुम्हाला सुकी हवी की रसरशीत हवी त्याप्रमाणे पाणी घाला. आता यात चवीनुसार मीठ घाला. एकत्र करा आणि १५ ते २० मिनिटे ही भाजी झाकण ठेवून शिजवून घ्या. मग वर कोथिंबीर घाला. तुम्हाला पाहिजे असेल तर ही प्रोसेस कुकरमध्ये एक वाफ किंवा एक शिटी काढून करू शकता. तर अश्याप्रकारे चमचमीत मटार भाजी खाण्यासाठी तयार आहे.
-संचिता केळकर