काँग्रेसचा आणीबाणीचा कलंक पुसला जाणार नाही

लोकसभेत पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर जोरदार हल्ला

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
14th December, 11:52 pm
काँग्रेसचा आणीबाणीचा कलंक पुसला जाणार नाही

नवी दिल्ली : भारत ही लोकशाहीची जननी आहे. संविधानाची ७५ वर्षे हा देशासाठी संस्मरणीय प्रवास आहे. आमच्यासाठी हा उत्सव साजरा करण्याचा क्षण आहे. मात्र, संविधानाला जेव्हा २५ वर्षे पूर्ण होत होती तेव्हा देशात संविधानाचे लचके तोडले जात होते. देशात आणीबाणी लागू केली गेली. काँग्रेसच्या माथ्यावरील हे पाप कधीच धुतले जाणार नाही. कारण लोकशाहीची गळचेपी करण्यात आली होती, अशा शब्‍दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गांधी घराण्यावर टीका केली.
राहुल गांधी यांच्या संविधानावरील भाषणाला उत्तर देताना लोकसभेत शनिवारी पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या गेल्या ७५ वर्षांच्या कारभाराच्या चिंधड्या उडविल्या. पंतप्रधानांनी काँग्रेसने संविधानाचा कसा गैरवापर केला याचा पाढाच वाचला. मोदी म्हणाले, शहाबानो प्रकरणात संविधानात दुरुस्ती करून राजीव गांधी यांनी कट्टरपंथीयांपुढे माथा टेकला आणि सर्वोच्च न्यायालयाचा निकाल बदलला. तेव्हा देशाने काँग्रेस मतांसाठी काय करू शकते हे पाहिले. आता एक अहंकारी व्यक्ती आपल्याच सरकारचा अध्यादेश पत्रकारांसमोर फाडतो, असे म्हणत मोदींनी राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली.

काँग्रेसच्या काळात संविधानिक व्यवस्‍थांची मुस्‍कटदाबी झाली होती. काँग्रेसच्या एका कुटुंबाकडून संविधानाला वारंवार धक्‍का पोहचवला गेला. त्‍यांनी केलेल्‍या पापाला कोणीही माफ करणार नाही. मनमोहन सिंग यांनी काढलेला आदेश राहूल गांधी यांनी फाडला हा संविधानाचा अपमान नाही का ? _ नरेंद्र मोदी, पंतप्रधान

हेही वाचा