कला-संस्कृती : सरेंडीपिटी महोत्सवात ‘द सिडक्शन'

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
13th December, 01:53 pm
कला-संस्कृती : सरेंडीपिटी महोत्सवात ‘द सिडक्शन'

पणजी : येत्या १५ डिसेंबर रोजी पणजी शहरात सरेंडीपिटी कला महोत्सव सुरू होत आहे. या अनुषंगाने सुरू असलेली तयारी सध्या अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. यंदा महोत्सवात 'प्राऊड पणजीकर मल्टीमीडिया इव्हेंट'चा प्रारंभ होणार आहे. ब्रॉडवेचे लोकप्रिय नाट्यलेखक नील सायमन यांचे ' द सिडक्शन' हे भन्नाट असे विनोदी लघु नाट्य या कार्यक्रमाचे सर्वात मुख्य आकर्षण असेल.

 हे लघु नाट्य ज्ञानेश मोघे यांनी दिग्दर्शित केले असून सलील नाईक, अमांडा रॉड्रीगीज आणि अफ्ताब फारुकी यांच्या त्यात प्रमुख भूमिका आहेत. अवघ्या ४०  मिनिटे कालावधीचे हे इंग्रजी लघु नाट्य प्रेक्षकांच्या चेहऱ्यावर दिलखुलास हास्य निर्माण करणारे असेल. जुन्या पाटो पुलाच्या बाजूला नव्यानेच नूतनीकरण केलेल्या जुन्या सार्वजनिक बांधकाम खात्याच्या इमारतीत १५, १६, १९, २१ आणि २२ डिसेंबर असे पाच दिवस, रोज सायंकाळी ७ वाजता या लघुनाट्याचे प्रयोग सादर केले जातील. हे प्रयोग सर्वांसाठी खुले आहेत. 

'प्राऊड पणजीकर मल्टीमीडिया इव्हेंट'मध्ये १५ ते २२ डिसेंबर पर्यंत चालणाऱ्या कार्यक्रमात नृत्य, ध्वनी-दृश्य माध्यम, सायलेंट डिस्को आणि योग या कार्यक्रमांचा देखील समावेश आहे. रोज सकाळी ८ ते संध्याकाळपर्यंत हे कार्यक्रम चालू असतील. हा उत्सव पणजीत चालणाऱ्या सेरेंडीपीटी आर्ट फेस्टिवलचा भाग आहे.

हेही वाचा