जगाच्या इतिहासातील पहिली सर्वात श्रीमंत व्यक्ती, इलॉन मस्क !

डोनाल्ड ट्रम्प यांच्या विजयानंतर इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th December, 10:37 am
जगाच्या इतिहासातील पहिली सर्वात श्रीमंत व्यक्ती, इलॉन मस्क !

अमेरिका: टेस्ला कंपनीचे प्रमुख आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती इलॉन मस्क यांनी एक नवा इतिहास रचला आहे. ४०० अब्ज डॉलर्सची संपत्ती असणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले असून ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सने नुकत्याच जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, इलॉन मस्कची संपत्ती सुमारे ४४७ अब्ज डॉलर पेक्षा जास्त आहे. एवढी संपत्ती असणारे मस्क जगातील पहिले व्यक्ती ठरले आहेत.

अमेरिकेच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीत डोनाल्ड ट्रम्प यांचा विजय झाल्यापासून इलॉन मस्क यांच्या संपत्तीत सातत्याने वाढ होत असल्याचे अमेरिकन तज्ञांचे म्हणणे आहे. अमेरिकेतील अध्यक्षीय निवडणुकीपूर्वीपासून, टेस्लाचे शेअर्स ६५ टक्क्यांनी वाढले असल्याचेही दिसून आले आहे. ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्सनुसार, एका दिवसात इलॉन मस्कच्या संपत्तीत ६२.८ अब्ज डॉलर्सची वाढ झाली आहे, त्यानंतर त्यांची संपत्ती ४०० अब्ज डॉलर्सच्या पुढे जाऊन ४४७ अब्ज डॉलरवर पोहोचली आहे. स्पेसएक्सच्या शेअर्सच्या वाढीमुळे टेस्ला प्रमुखाच्या नेट वर्थमध्ये अचानक मोठी वाढ झाली आहे. 

डोनाल्ड ट्रम्प यांचा पाठिंबा ठरले महत्त्वाचे कारण

इलॉन मस्क यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना दिलेला पाठिंबा आणि त्यांच्या अध्यक्षीय मोहिमेसाठी दिलेल्या १०० दशलक्ष डॉलर्सपेक्षा जास्त योगदान यामुळे मस्क आणि त्यांच्या कंपन्यांवरील गुंतवणूकदारांचा विश्वास दृढ झाला आहे. इलॉन मस्क यांची नुकतीच स्टेबल डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट इफिशियन्सीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्या ठिकाणी ते बायोटेक तज्ज्ञ विवेक रामास्वामी यांच्यासोबत काम करतील.

हेही वाचा