‘पुष्पा २: द रुल’ बाबत महत्वाची अपडेटः हिंदी भाषेत पाहता योणार नाही 'पुष्पा २'

रिलीजच्या दोन दिवसांपूर्वीच घेतला मोठा निर्णय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
04th December, 09:10 pm
‘पुष्पा २: द रुल’ बाबत महत्वाची अपडेटः हिंदी भाषेत पाहता योणार नाही 'पुष्पा २'

मुंबईः सध्या सध्या सर्वत्र ‘पुष्पा २: द रुल’ ची क्रेझ पाहायला मिळत आहे. ५ डिसेंबरला ‘पुष्पा २: द रुल’ हा चित्रपट संपूर्ण देशात प्रदर्शित होणार आहे. रिलीजच्या आधीच चित्रपटाने नवे रेकॉर्ड्स बनवायला सुरुवात केली आहे. या सिनेमाची तिकिटेही वेगाने विकली जात आहेत. मात्र, अशातच प्रेक्षकांना नाराज करणारी बातमी समोर आली आहे.

‘पुष्पा २: द रूल’ या चित्रपटाचा ३डी व्हर्जन पाहता येणार नाही. या आठवड्यात प्रेक्षकांना केवळ २ डी व्हर्जनमध्ये चित्रपट पाहता येणार आहे. चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी ४ डिसेंबर रोजी मध्यरात्री शो प्रदर्शित होणार नसल्याचेही समोर आले आहे.

व्यापार विश्लेषक तरण आदर्श यांनी याबाबतची माहिती दिली आहे. एक्स या सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर पोस्ट करत त्यांनी ही माहिती सांगितली आहे. आदर्श यांनी म्हटलं आहे की, ‘पुष्पा २ ची ३डी आवृत्ती या आठवड्यात प्रदर्शित होणार नाही.

‘पुष्पा २: द रूल’ची चाहत्यांमध्ये जबरदस्त क्रेझ आहे. चित्रपटाच्या टायटल ट्रॅकसह अनेक गाणी रिलीज झाली आहेत. अंगारो, किसिक आणि पीलिंग्स सारखी गाणी युट्यूबवर धुमाकूळ घालत आहेत. ‘पुष्पा २: द रूल’ची अॅडव्हान्स बुकिंग आधीच सुरू झाली आहे. सुकुमार दिग्दर्शित या चित्रपटात अल्लू अर्जुन, रश्मिका मंदाना आणि फहाद फासिल महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसणार आहेत.

हेही वाचा