गोवा विद्यापीठ निवडणुकीत काँग्रेस-गोवा फॉरवर्डचा एकतर्फी विजय

अभाविपला हरवून १० पैकी ९ जागा जिंकल्या

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
36 mins ago
गोवा विद्यापीठ निवडणुकीत काँग्रेस-गोवा फॉरवर्डचा एकतर्फी विजय

पणजी : गोवा विद्यापीठात (Goa University) काँग्रेस-गोवा फॉरर्वडच्या (Congress-Goa Forward) पॅनलने विद्यार्थी मंडळाच्या (Student Council) निवडणुकीत विजय मिळवला. या निवडणुकीत १० पैकी ९ जागा जिंकत प्रतिस्पर्धी अभाविपचा एनएसयुआयने पराभव केला. 

कॉंग्रेसची विद्यार्थी संघटना एनएसयुआयला गोवा फॉरवर्डच्या विद्यार्थी संघटनेचा पाठिंबा होता. या विद्यार्थी युतीने भाजपची विद्यार्थी संघटना अभाविपचा मोठ्या फरकाने पराभव करून गोवा विद्यापीठाच्या विद्यार्थी मंडळात मोठा विजय मिळवला. कुंकळ्ळीचे एनएसयुआयचे कार्यकर्ते साई देसाई मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. सोहम राऊत हे सचिव, श्रुती पवार ही महिला प्रतिनिधी म्हणून निवडून आले आहेत. 

ही निवडणूक १६ डिसेंबर रोजी घेण्याचे ठरले होते. पण निवडणुकीच्या दिवाा झेडपी निवडणुकीची आचारसंहितेचे कारण देऊन ही निवडणूक रद्द करण्यात आली होती. एनएसयुआयचे संभाव्य विजय पाहून मुद्दाम ही निवडणूक रद्द केली असा आरोप एनएसयुआयने केला होता. ही रद्द झालेली निवडणूक निकाल लागल्यावर मंगळवारी गोवा विद्यापीठात झाली.  

गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्याकडून अभिनंदन

१५ वर्षांनंतर गोवा विद्यापीठ विद्यार्थी मंडळाच्या २०२५ २६ च्या निवडणुकीत कॉंग्रेस गोवा फॉरवर्डने दणदणीत विजय मिळवला आहे. विद्यार्थ्यांनी एनएसयुआय आणि गोवा फॉरवर्डला निर्णायक कौल दिला. एनएसयुआय आणि निवडून आलेल्या सर्वांचे अभिनंदन असे कॉंग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी म्हटले आहे. 


हेही वाचा