मनोज परबने मागितली ठाकरेंची माफी

नेटकऱ्यांनी केले कौतुक; शांत राहण्याचा दिला सल्ला

Story: प्रतिनिधी।गोवन वार्ता |
45 mins ago
मनोज परबने मागितली ठाकरेंची माफी

पणजी : मनोज परब (Manoj Parab) यांनी कॉंग्रेसचे (Congress) गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची माफी मागितली आहे. रागाच्या भरात आपण हे अपशब्द वापरलेले, त्यात वैयक्तीक असे काही नाही. मी माझे शब्द मागे घेतो, असे आरजीपीचे (RGP) प्रमुख मनोज परब यांनी म्हटले आहे. नेटकाऱ्यांनी याचे स्वागत केले आहे व शांत राहण्याचा सल्ला दिला आहे. 

युती फिस्कटल्यानंतर मनोज परब यांनी कॉंग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांच्यावर शाब्दिक बाण सोडत कठोर टिका केली होती. याला कॉंग्रेसच्या नेत्यांनी हरकत घेतली होती. पण मंगळवारी सकाळी झेडपी निवडणुकीचा (Zilla Panchayat Election) निकाल झाल्यानंतर मनोज परब यांनी ठाकरेंची सोशल मिडीयावर (Social Media) जाहीर माफी मागितली. 

कॉंग्रेसचे गोवा प्रभारी माणिकराव ठाकरे यांची मी माफी मागतो. युती तुटतल्याचा राग आणि निराशेच्या भरात माझ्या तोंडातून हे शब्द बाहेर पडले, असे स्पष्टीकरण परब यांनी सोशल मिडीयाच्या पोस्टद्वारे दिले आहे. 

युती तुटणे ही माझ्यासाठी भावनिक नजरेतून अस्वस्थ करणारी गोष्ट होती. कारण गोव्याच्या हितासाठी आरजीला युती झालेली हवी होती. माझे शब्द वैयक्तीक नव्हते, पण निराशेतून ते आले. मी ते शब्द मागे घेतो आणि दिलगिरी व्यक्त करतो, असे मनोज परब म्हणाले. 

परब यांच्या सोशल मिडीयाच्या पोस्टवरील ‘कमेंट’वर लोकांच्या प्रतिक्र‌िया आल्या आहेत. भाषेचा वापर करताना पक्षाच्या अध्यक्षांनी सावधगिरी बाळगावी, असा सल्ला क्लियोफात आल्मेदा यांनी दिली आहे. राजकारणात थंड आणि परिपक्व रहावे, केंद्रीय पक्षांकडे अनुभव आणि संसाधने असतात. त्यासाठी नम्र रहावे, असा सल्ला नेटकऱ्यांनी दिला आहे. शब्द हे जपून वापरायचे असतात, एकदा बोलले शब्द परत घेता येत नाहीत, त्यासाठी शब्द जपून वापरावे आणि मुत्सद्देगिरीच्या राजकारणात खबरदारी घ्यावी, असा सल्ला आणखी एका नेटकऱ्याने दिला आहे.

आरजीपीला मोठे व्हायचे असल्यास भविष्यात त्यांनी आपल्या भावनांवर ताबा ठेवावा, असाही सल्ला एका कमेंटमधून दिला आहे. मनोज बाब माफी मागण्याची तुझ्याकडे सभ्यता आहे ती पाहून चांगले वाटले. अहंकार, मतभेद आणि व्यक्तीगत हेतू बाजूला ठेवून जी चूक झाली आहे ती परत २०२७ च्या विधानसभा निवडणुकीत होणार नाही, हे निश्चित करणे काळाजी गरज असल्याचा सल्ला एका  नेटकऱ्याने दिला आहे. 


 






हेही वाचा