पाच जण घरफोडी करण्यासाठी आल्याचा स्थानिकांचा संशय

पणजी : गोव्यातील (Goa) भुतेभाट,वास्को (Vasco) येथे घरफोडी करण्यासाठी आल्याच्या संशयावरून स्थानिकांनी एकाला पकडले व खांब्याला बांधून बेदम मारहाण केली. नंतर पोलिसांच्या (Police) स्वाधिन केले.
स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार, पाच जण एका घरात घरफोडी करण्याच्या उद्देशाने आत गेले. काही तरी चाहूल लागल्याने चार जण पळाले तर एकटा स्थानिकांच्या हाती लागला. त्याला पकडून खांब्याला बांधून बेदम मारहाण करण्यात आली. नंतर पोलिसांच्या स्वाधिन केले. घरातील मंडळी बाहेरगावी गेल्याने घर गेले पाच दिवस बंद होते; अशी माहिती ही स्थानिकांनी दिली. यासंदर्भात वास्को पोलीस पुढील तपास करीत आहेत.