स्वयं नाईकला दुसरे स्थान : अजिंक्य चेस अकादमीतर्फे स्पर्धेचे आयोजन
पणजी : कुर्टी बुद्धिबळ स्पर्धेत अवनिश बोरकर याने विजेतेपद पटकावले. अवनिश बोरकरने ६.५ गुणांसह स्पर्धेत आपला दबदबा निर्माण केला. स्पर्धा श्रीकृष्ण मंदिर सभागृह, कुर्टी येथे अजिंक्य चेस अकादमीने फोंडा तालुका चेस असोसिएशनच्या सहकार्याने केले होते.
या स्पर्धेत तीन खेळाडूंनी प्रत्येकी ६ गुणांसह पहिले स्थान मिळवल्यामुळे टायब्रेकरवर निर्णय घेण्यात आला. यात स्वयं नाईकने दुसरे स्थान पटकावले तर सात्विक केरकरने तिसरे स्थान मिळविले.
स्पर्धेतील प्रथम दहा खेळाडू : अवनिश बोरकर (६.५ गुण), स्वयं नाईक (६ गुण टायब्रेकरवर), स्वात्विक केरकर (६), चेतन कुर्टीकर (६), मयंक कुर्टीकर (५.५), सुप्रित प्रियोळकर (५.५), प्रतिष गावडे (५.५), जय मणेरीकर (५), सोपान देसाई (५), निशेष गावडे (५).
विविध श्रेणीतील उत्कृष्ट युवा कलागुणांना विशेष पुरस्कारही प्रदान करण्यात आले. १३ वर्षांखालील उत्कृष्ट : श्रीयश पॉल, ११ वर्षांखालील उत्कृष्ट : जय गावडे, ९ वर्षांखालील उत्कृष्ट : नित्यम गावडे, उत्कृष्ट महिला खेळाडू : भाविका सातारकर (कुर्टी), उदयोन्मुख खेळाडू : सियान केरकर.
बक्षीस वितरण समारंभाला फोंडा तालुका चेस असोसिएशनचे अध्यक्ष व गोवा चेस असोसिएशनचे उपाध्यक्ष सागर साकोर्डेकर, निवृत्ती शारीरिक शिक्षण शिक्षक श्रीकांत पाठक, फोंडा तालुका चेस असोसिएशनचे सचिव अमोघ नमशिकर व फोंडा तालुका चेस असोसिएशनचे सहसचिव संदेश नाईक यांची उपस्थिती होती. अजिंक्य चेस अकादमीचे आनंद कुर्टीकर यांच्या हस्ते विजेत्यांना चषक प्रदान करण्यात आला.