इफ्फी : अभिनेत्यांनी चाकोरी सोडून नवे प्रयोग करावेत : मनीषा कोईराला

‘इन कन्व्हर्सेशन’ सत्रात मतप्रदर्शन

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
25th November, 12:38 am
इफ्फी : अभिनेत्यांनी चाकोरी सोडून नवे प्रयोग करावेत : मनीषा कोईराला

‘इन कन्व्हर्सेशन’ सत्रात विचार मांडताना अभिनेत्री मनीषा कोईराला.

पणजी :
चित्रपटगृहात चित्रपट प्रदर्शित होणे असो किंवा ओटीटी प्लॅटफॉर्मवरील मालिका किंवा चित्रपट असो, या दोन्हीसाठी कलाकारांकडून समान स्तराची मेहनत, तयारी, प्रामाणिकपणा आणि मानसिकता आवश्यक आहे. अभिनेत्यांनी चाकोरी सोडून नवे प्रयोग करावेत, अशी अपेक्षा अभिनेत्री मनीषा कोईराला यांनी व्यक्त केली.

कला अकादमीच्या खचाखच भरलेल्या सभागृहात मनीषा कोईराला आणि दूरदर्शी चित्रपट निर्माते विक्रमादित्य मोटवानी यांचे टाळ्यांच्या कडकडाटात स्वागत करण्यात आले. ‘हिरामंडी’ मधील प्रतिष्ठित मल्लिकाजान आणि उडान, लुटेरा सारख्या गाजलेल्या चित्रपटांचे आणि सेक्रेड गेम्स या सारख्या मालिकेचे दिग्दर्शक विक्रमादित्य मोटवानी यांनी या सत्रात विचारांची देवाणघेवाण केली. ‘फ्रॉम बिग स्क्रीन टू स्ट्रीमिंग’ या विषयावरील वैचारिक ‘इन कन्व्हर्सेशन’ सत्रात ते सहभागी झाले होते.

अभिनेते अजूनही ओटीटी शोमध्ये काम करण्यास संकोच करतात का, असे विचारले असता, मनीषा कोईराला यांनी स्पष्टपणे उत्तर दिले की, त्याबद्दल इंडस्ट्रीमध्ये सतत चर्चा सुरू असते. कोणतीही नवीन आणि अपरिचित गोष्ट सुरुवातीला संशयास्पद वाटते. मात्र चांगली कलाकृती लोकांना ती स्वीकारण्यास प्रोत्साहित करतात. स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवरील प्रकल्पांबाबत चित्रपट उद्योगात अजूनही थोडी साशंकता आहे. मात्र येत्या काळात ती साशंकता संपुष्टात येईल.

ओटीटी प्लॅटफॉर्मसाठी लेखन करण्याबद्दल बोलताना विक्रमादित्य मोटवानी यांनी सांगितले की, ही संपूर्णपणे वेगळी प्रक्रिया आहे. लिहिताना एपिसोड्स आणि टायमिंग दोन्ही लक्षात ठेवावे लागते. 

हेही वाचा