गुन्हे वार्ता : सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल १५२ मोबाईल क्रमांक ब्लॉक

गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाची कारवाई

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
7 hours ago
गुन्हे वार्ता : सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल १५२ मोबाईल क्रमांक ब्लॉक

पणजी : राज्यात सायबर गुन्हेगारांच्या भक्ष्यस्थानी पडणाऱ्यांची संख्या सातत्याने वाढत आहे. गुन्हेगारांनी दिलेल्या आमिशास बळी पडून अनेकांनी आतापर्यंत कोट्यवधी गमावलेत. दरम्यान गोवा पोलिसांच्या सायबर विभागाने आपल्या सुसज्ज यंत्रणांच्या माध्यमातून अनेक गुन्ह्यांची उकल करत अनेक जणांना न्याय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. 

दरम्यान नुकत्याच समोर आलेल्या माहितीनुसार, गोवा पोलिसांच्या सायबर गुन्हे विभागाने गेल्या एका महिन्यात सायबर गुन्हेगारीत गुंतलेले तब्बल १५२ मोबाइल क्रमांक ब्लॉक केलेत. या क्रमांकांद्वारे लोकांची चुकीच्या मार्गाने फसवणूक करत त्यांच्याकडून पैसे उकळले जात होते. गोवा पोलीस आपल्या अत्याधुनिक यंत्रणेद्वारे नेहमीच सायबर घोटाळेबाजांवर लक्ष ठेवून असते. येत्या काळातही सायबर गुन्हेगारीत लिप्त असलेल्यांवर कडक कारवाई सुरूच राईल असे पोलिसांनी सांगितले.   


हेही वाचा