फिल्म बाजाराचे भव्य उद्घाटन
पणजी : 'चित्रपट पैशाने बनत नाहीत, चित्रपट हे आवडीने बनवले जातात. "फिल्म मार्केटमधील सहभागींमध्ये खूप आवड आहे आणि तुमच्या भावना या आवडीशी जुळल्या पाहिजेत,' असे प्रसिद्ध चित्रपट निर्माते आणि आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे (इफ्फी) संचालक संजय कपूर यांनी सांगितले.
दक्षिण आशियातील सर्वात मोठ्या फिल्म बाजाराच्या १५ व्या आवृत्तीचे उद्घाटन महोत्सव संचालक शेख कपूर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू, सहसचिव प्रिथुल कुमार, ऑस्ट्रेलियाचे उपउच्चायुक्त निकोलस मॅककॅफ्री आणि इतर मान्यवर उपस्थित होते.
यावर्षी फिल्म बाजारात कंट्री ऑफ फोकस ऑस्ट्रेलिया, जपान आणि उझबेकिस्तानसह १० देश आपले फिल्म मार्केटमध्ये त्यांचे स्टॉल लावणार आहेत. याशिवाय, चित्रपट निर्मात्यांना सवलती आणि सुविधा देणारी १२ राज्ये त्यांचे स्टॉल लावतील.
याशिवाय, परदेशी चित्रपट निर्मात्यांना भारतात येऊन चित्रपट बनवण्यासाठी सिंगल विंडो क्लिअरन्स आणि इतर अनुदान देणारे न्यू इंडिया सिने हब, या संकेत थळाचे लोकार्पण करण्यात आले.
यावेळी कपूर म्हणाले, “चित्रपट बाजारात मला एक नवीन उत्साह पाहायला मिळाला. माझ्यासोबत वीस चित्रपट निर्मात्यांनी माझ्याशी चर्चा केली असून याचा अर्थ चित्रपट निर्मिती अजूनही जिवंत आहे.
चित्रपटाच्या बाजारपेठेतील हे चैतन्य दिसून येत असून ते नवीन चित्रपटांसाठी व्यासपीठ बनत आहे. मी उत्साही नवीन चित्रपट निर्मात्यांना भेटलो आणि मला तेव्हा असे वाटले की मी देखील त्यांच्या सारखाच होतो. पण त्यावेळी सर्वांनी मला सांगितले की तू चित्रपट बनवू शकत नाहीस. तुला पैशांची गरज आहे. पण मी तुम्हाला सांगू इच्छितो की चित्रपट पैशाने नव्हे तर चित्रपट पैशाने नाही तर उत्कटतेने बनवले जातात,” असे मत कपूर यांनी मांडले.