आरसीबीकडून सात खेळाडू लिलावासाठी उपलब्ध : मुंबई, दिल्ली संघांनी आपले मुख्य खेळाडू ठेवले कायम
मुंबई : आयपीएलच्या मेगा लिलावाची चर्चा रंगत असताना आगामी महिला प्रीमिअर लीग (डब्ल्यूपीएल) संदर्भात एक मोठी घोषणा करण्यात आली आहे. मिनी लिलावााधी डब्ल्यूपीएलमधील सर्व फ्रँचायझी संघांनी आपल्या ताफ्यातील खेळाडू रिटेन रिलीजचा डाव खेळला आहे. गत हंगामातील चॅम्पियन रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने आपल्या ताफ्यातील ७ महिला खेळाडूंना रिलीज केले आहे. याशिवाय दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्ससारख्या संघाने आपल्या ताफ्यातील मुख्य खेळाडूंना कायम ठेवण्याला पसंती दिली आहे.
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु :रिटेन: स्मृती मानधना (कर्णधार), एस मेघना, ऋचा घोष, एलिसा पेरी, जॉर्जिया वेरेहम, श्रेयंका पाटील, आशा शोभना, सोफी डिव्हाइन, रेणुका सिंह, सोफी मोलिनेक्स, एकता बिष्ट, केट क्रॉस, कनिका आहूजा, डॅनियल व्याट (ट्रेड).रिलीज: दिशा कसाट, इंद्राणी रॉय, नादिन डी क्लार्क, शुभा सतीश, श्रद्धा पोकरकर, सिमरन बहादुर, हीथर नाइट.
मुंबई इंडियन्स : रिटेन: हरमनप्रीत कौर (कर्णधार), पूजा वस्त्राकर, यास्तिका भाटिया, नॅट सायव्हर-ब्रंट, हेली मॅथ्यूज, अमेलिया केर, क्लो ट्रायॉन, अमनजोत कौर, सायका इशाक, जिंतिमनी कलिता, एस सजना, कीर्तन बालाकृष्णन, शबनीम इस्माइल.रिलीज: प्रियांका बाला, हुमेरा काजी, फातिमा जाफर, ईसी वोंग.
दिल्ली कॅपिटल्स : रिटेन: शफाली वर्मा, जेमिमा रोड्रिग्स, तानिया भाटिया, राधा यादव, अरुंधती रेड्डी, शिखा पांडे, स्नेहा दीप्ती, मिन्नू मणि, तितास साधु, मेग लेनिंग, एलिस कॅप्सी, मारिजेन कँप, जेस जोनासेन, एनाबेल सदरलँड. रिलीज: लॉरा हॅरिस, अश्विनी कुमारी, पूनम यादव, अपर्णा मोंडल.
यूपी वारियर्स :रिटेन: एलिसा हीली (कर्णधार), ताहलिया मॅकग्रा, ग्रेस हॅरिस, दीप्ती शर्मा (उप कर्णधार), श्वेता सेहरावत, सोफी एक्लेस्टोन, चामरी अटापट्टू, किरण नवगिरे, राजेश्वरी गायकवाड, अंजली सरवानी, उमा छेत्री, पूनम खेमनार, साइमा ठाकोर, गौहर सुल्ताना, वृंदा दिनेश. रिलीज: लक्ष्मी यादव, पार्श्ववी चोपडा, लॉरेन बेल, एस यशाश्री.
गुजरात जाएंट्स :रिटेन: हरलीन देओल, दयालन हेमलता, तनुजा कंवर, शबनम शकील, मन्नत कश्यप, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण, सयाली सथगरे, मेघना सिंह, तृषा पूजिता, प्रिया मिश्रा, बेथ मूनी, एशले गार्डनर, लॉरा वॉल्व्हार्ड, ली ताहुहु, फोएबे लिचफील्ड, कॅथरीन ब्राइस. रिलीज: स्नेह राणा, कॅथरीन ब्राइस, तृषा पूजिथा, वेदा कृष्णमूर्ती, तरन्नुम पठाण, ली ताहुहू.