अमेरिकेत पुन्हा ‘ट्रम्प युग’

राष्ट्राध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवड संसदेवरही मिळवला ताबा

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
07th November 2024, 12:49 am
अमेरिकेत पुन्हा ‘ट्रम्प युग’

वॉशिंग्टन : अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूक शर्यतीत रिपब्लिक पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी (दि.६) बाजी मारली. त्‍यांनी डेमोक्रेटिक पक्षाच्या उमेदवार कमला हॅरिस यांचा पराभव केला. ट्रम्प राष्ट्राध्यक्ष म्हणून दुसऱ्यांदा जबाबदारी स्वीकारत आहेत. यापूर्वी ट्रम्प २०१६ ला पहिल्यांदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बनले होते. तर २०२० च्या निवडणुकीत ते जो बायडेन यांच्याकडून पराभूत झाले होते.
ट्रम्प यांनी आपल्या विजयाबद्दल आनंद व्यक्त करताना म्हटले की, आजचा दिवस अविश्वसनीय आहे. कारण अमेरिका राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत समर्थकांनी आपल्याला अभूतपूर्व आणि शक्तिशाली जनादेश दिला आहे. अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून निवडून दिल्याबद्दल ट्रम्प यांनी यावेळी अमेरिकन जनतेचे आभार मानले. दरम्यान, असोसिएटेड प्रेसने दिलेल्या माहितीनुसार, रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार ट्रम्प यांना २७७ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी उमेदवार कमला हॅरिस यांना २१४ इलेक्टोरल कॉलेज मते मिळाली. जो उमेदवार २७० किंवा अधिक इलेक्टोरल कॉलेज मते जिंकतो त्याचीच अध्यक्षपदी निवड केली जाते.


हेही वाचा