देवेश नाईक याला द्वितीय तर ऋषिकेश परब याला तृतीय क्रमांक
विजेत्या खेळाडूंसोबत मान्यवर.
पणजी : मुरगाव तालुका बुद्धिबळ असोसिएशनने ४ आणि ५ नोव्हेंबर रोजी सेंट थेरेसा स्कूल हॉल, मांगोर हिल, वास्को द गामा येथे आयोजित केलेल्या कै. व्यंकटेश आणि सुमथी शानभाग रोलिंग ट्रॉफी ऑल गोवा ओपन रॅपिड चेस टूर्नामेंट २०२४ च्या ५ व्या आवृत्तीचे विजेतेपद बार्देश तालुक्यातील मंदार लाडने पटकावले.
फोंडा तालुक्यातील देवेश नाईक आणि मुरगाव तालुक्यातील ऋषिकेश परब यांनी अनुक्रमे द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावला.
टॉप २० विजेते: मंदार लाड, देवेश नाईक, ऋषिकेश परब, अनिकेत एक्का, आर्यव्रत नाईक देसाई, रुद्रेश फडते, एर्विन अल्बुकर्क, वसंत नाईक, आर्या दाभोळकर, संजिल होबळे, देबज्योती पॉल, हृदय मोर्जेकर, दत्ता कांबळी, यश प्रभू, अर्थव शिरोडकर, कविश घारसे, हर्ष नागवेकर, लिया सिल्वेरा, अनिश नाईक, स्कायला रॉड्रिग्ज. सर्वोत्कृष्ट खेळाडू (पुरुष): भीमप्पा हरिजन, इलियास बॅरेटो, सर्वोत्कृष्ट महिला: ज्योती पवार, ७ वर्षांखालील मुलगे: आरव नागेशकर, इव्हान अँटोनियो टेलेस, ७ वर्षांखालील मुली : आराध्या देसाई, सिडोनिया डाकुन्हा; ९ वर्षांखालील मुलगे: ऋषित गावस, श्रेष्ठ घोणसेकर; ९ वर्षांखालील मुली: शिनेल रॉड्रिग्ज, शानवी रेडकर, ११ वर्षांखालील मुलगे: समर पोवार सारस, रुद्र जी. नगरसेकर; ११ वर्षांखालील मुली: अस्मी तेरसे, अरणा सावंत, १३ वर्षांखालील मुलगे: रुद्र गावस, तपस्या गोविंद भट, १३ वर्षांखालील मुली : जेनिका सिक्वेरा, मैझा सय्यद, १५ वर्षांखालील मुलगे : कविश बोरकर, विभव केरकर, १५ वर्षांखालील मुली : अवनी कामत, रचना केवट. सर्वोत्कृष्ट मुरगाव येथील खेळाडू: ७ वर्षांखालील मुलगे : अंश गावस, रंश होबळे, ७ वर्षांखालील मुली : एरिशा परेरा, परेरा दे आंद्रादे, ९ वर्षांखालील मुलगे: रेज्मॉन गेविन फर्नांडिस, अयान शेटगावकर, ९ वर्षांखालील मुली : केळूस्कर सुरवी, घोंगे द्रीशा, ११ वर्षांखालील मुलगे : रायस डॉमनिक कार्व्हालो, सार्थ देसाई, ११ वर्षांखालील मुली: साहा मिश्का, नदाफ अक्सा शरीफ, १३ वर्षांखालील मुलगे : संचित पै, सिद्ध राणे, १३ वर्षांखालील मुली : लावण्या नाईक, पवित्रा लिंगसुगुर; १५ वर्षांखालील मुलगे : चैतन्य पाटील, अंश रेडकर, १५ वर्षांखालील मुली : श्री घोणसेकर, बागवाले जलीशा, सर्वोत्कृष्ट अकादमीचा खेळाडू: ७ वर्षांखालील मुलगे : श्रीहन चौगले, ९ वर्षांखालील मुलगे: आदित्य, अमित, ९ वर्षांखालील मुली : कृतिका अग्रवाल, ११ वर्षांखालील मुलगे : सोहम ढोपले, ११ वर्षांखालील मुली : टोरेस डॅझल, १३ वर्षांखालील मुलगे : श्लोक मेस्ता, १३ वर्षांखालील मुली : दिव्यांशा केवट, १५ वर्षांखालील मुलगे : सिंग अनारवा, सर्वोत्कृष्ट कणकवलीतील खेळाडू : रुद्र मोबारकर, ग्रीष्मा आडेलकर, सर्वोत्कृष्ट तरुण खेळाडू: बार्रेटो एलियाझा फासेलिया, शेट तानावडे आरुष. सर्वोत्कृष्ट उदयोन्मुख खेळाडू: सिंगबाळ मुदित परेश यांची निवड करण्यात आली.
यावेळी एमटीसीएचे अध्यक्ष किशोर बांदेकर, एमटीसीएचे सचिव मुकुंद कांबळी, एमटीसीएचे खजिनदार पुंडलिक नायक, एमटीसीएचे उपाध्यक्ष मुकेश अधिया, सुखांत शानभाग यांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली.