आरोग्य वार्ता : क्षयरोगावर भारताची मात; लक्षणीय गतीने कमी झालेत रुग्ण : जागतिक आरोग्य संघटना

क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी भारताने ऐतिहासिक पावले उचलल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे. परिणामी, २०१५ मध्ये १ लाख लोकसंख्येमागे २३७ टीबी रुग्ण होते, जे २०२३ मध्ये १९५ इतके कमी झाले.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd November 2024, 10:46 am
आरोग्य वार्ता  : क्षयरोगावर भारताची मात; लक्षणीय गतीने कमी झालेत रुग्ण : जागतिक आरोग्य संघटना

मुंबई : जागतिक आरोग्य संघटनेने टीबी संसर्गाविरुद्धच्या लढ्यात भारताच्या एकंदरीत कार्याचा गौरव केला असून 'सुपर हीरो'ची उपाधी दिली आहे. गेल्या आठवड्यात प्रसिद्ध झालेल्या अहवालात, जागतिक आरोग्य संघटनेने भारताच्या क्षयरोग निर्मूलनात केलेल्या अद्वितीय कार्याची नोंद घेतली असून असे काम व अशी प्रगती आजवर कोणत्याही देशांत झाली नसल्याचे म्हटले आहे. 


India's ambitious new plan to conquer TB needs cash and commitment


 टीबीच्या रुग्णांमध्ये घट, उपचारांच्या व्याप्तीत वाढ

अहवालात असे म्हटले आहे की २०२३ मध्ये भारतात २७ लाख टीबी रुग्ण होते, त्यापैकी २५.१ लाख लोकांवर उपचार करण्यात आले. भारतातील क्षयरोग पीडित उपचारांची व्याप्ती २०१५ मधील ७२ टक्क्यांवरून वरून २०२३ मध्ये ८९ टक्क्यांपर्यंत वाढली आहे. क्षय पीडितांची ओळख पटवणे व त्यांवर त्वरित उपचार करणे यामुळे ही तफावत आढळून आली. भारतात असलेल्या १.७ लाखांहून अधिक आयुष्मान आरोग्य मंदिरांद्वारे क्षयरोगींवर उपचार केले जातात. 


The Global TB Report 2024 by WHO acknowledged India's progress in tackling  Tuberculosis, ET HealthWorld

क्षयरोगाचे निर्मूलन करण्यासाठी भारताने ऐतिहासिक पावले उचलल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने मान्य केले आहे.  परिणामी, २०१५ मध्ये १ लाख लोकसंख्येमागे २३७ टीबी रुग्ण होते, जे २०२३ मध्ये १९५ इतके कमी झाले. आकडेवारीनुसार, क्षयरोगामुळे पूर्वी एक लाख लोकसंख्येमागे २८ मृत्यू होते, आता ते २२ वर आले आहे. ही २१.४ टक्क्यांची घट आहे.

India records 17.7% decline in TB incidence from 2015 to 2023: WHO report |  Health News - Business Standard

सरकारच्या प्रयत्नांचे जागतिक आरोग्य संघटनेकडून कौतुक 

 भारत सरकार राष्ट्रीय क्षय निर्मूलन कार्यक्रम चालवत आहे. यासाठी बजेटमधील तरतुदीत ५.३ पट वाढ करण्यात आली आहे. २०१५ मध्ये अर्थसंकल्पात क्षय निर्मूलन कार्यक्रमासाठी ६४० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली.  ते २०२२-२३ मध्ये वाढून ३४०० कोटी रुपये झाले. या अहवालानुसार क्षयरोग कार्यक्रमासाठी सर्वाधिक पैसा सरकारी संसाधनांमधून येतो. यातील माहितीनुसार गेल्या काही वर्षांमध्ये, भारत अत्याधुनिक आण्विक निदान साधने वाढविण्यात, नवीन आणि अधिक प्रभावी उपचार पद्धती सादर करण्यात आणि सर्व टीबी रुग्णांना मोफत तपासणी, निदान आणि उपचार प्रदान करण्यात सक्षम झाला आहे. याशिवाय भारतातील खासगी रुग्णालयेही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेत आहेत. २०२३ मध्ये आढळलेल्या एकूण क्षयरुग्णांपैकी ३२.९ टक्के रुग्ण हे खाजगी रुग्णालयांमध्ये आढळून आले आहेत.


India TB Report 2024

जागतिक आरोग्य संघटनेने भारतातील क्षयरुग्णांना पौष्टिक आहार देण्यासंदर्भातील योजनांचे कौतुक केले आहे.  या वर्षीच ऑक्टोबरमध्ये केंद्र सरकारने 'नि-क्षय पोषण योजनेंतर्गत (NPY) दरमहा देण्यात येणारी ५०० रुपयांची रक्कम वाढवून १००० रुपये केली आहे. याअंतर्गत आतापर्यंत १.१३  कोटी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ३,२०२ कोटी रुपये थेट पाठवण्यात आले आहेत. त्याच वेळी, सुमारे १२ लाख कुपोषित टीबी रुग्णांना एनर्जी डेन्स न्यूट्रिशनल सप्लिमेंट (EDNS) द्वारे कव्हर केले जाईल. याशिवाय, आरोग्य मंत्रालय टीबी रुग्णांच्या घरोघरी संपर्क साधण्यासाठी नी-क्षय मित्र उपक्रम सुरू ठेवत आहे, याअंतर्गत रुग्णांना दत्तक घेतले जात आहे. त्याच वेळी, भारतात ८०० हून अधिक AI-सक्षम पोर्टेबल चेस्ट एक्स-रे मशीन स्थापित करण्यात आलेत. याशिवाय, ७,७६३ जलद आण्विक चाचणी सुविधा दिल्या जात आहेत. 


High TB treatment coverage in India, surge in preventive therapy: WHO report  | India News - The Indian Express


 पाच वर्षांपूर्वी भारताच्या नेतृत्वाखाली संपूर्ण जगाने २०३० पर्यंत क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट ठेवले होते. मात्र यानंतर २०१९ साली भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत हे लक्ष्य गाठण्याचे आश्वासन दिले .अशा परिस्थितीत पंतप्रधान मोदींनी ५ वर्षांपूर्वी घेतलेल्या पुढाकाराचे आता यशस्वी परिणाम मिळू लागले आहेत, असेही जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालात म्हटले आहे. 

The Mumbai Mission for TB Control – Improving TB care in India – ReAct


हेही वाचा