डॉकिंग तंत्रज्ञान वापरणारा भारत हा चाैथा देश
श्रीहरिकोटाः सरत्या वर्षाला म्हणजे २०२४ ला निरोप देता देता भारताने नवा इतिहास रचला आहे. भारताने पुन्हा एकदा अंतराळ भरारी घेतली आहे. ही भरारी घेतानाच भारताने अमेरिकेच्या नासासारख्या स्पेस एजन्सीला टक्कर देण्याचे काम केले आहे. भारताच्या इस्रोने एक मोठा इतिहास रचला आहे. भारताने आंध्र प्रदेश येथील श्रीहरीकोटाच्या सतीश धवन अंतराळ केंद्रातून रात्री १० वाजण्याच्या सुमारास स्पॅडेक्स मिशनचे प्रक्षेपण केले आहे. पीएसएलव्ही- सी६० रॉकेटमधून २ छोटे स्पेसक्राफ्ट लॉन्च केले आहेत. स्पॅडेक्स (SpaDex) लॉन्च करणारा भारत हा जगातील चौथा देश बनला आहे.
भारताने हे मिशन यशस्वी केल्यानंतर अमेरिका, रशिया आणि चीनच्या एलिट क्लबमध्ये सामील झाला आहे. विशेष म्हणजे भारताने या डॉकिंग सिस्टिमवर पेटंट घेतल्याची गौरवाची बाब समोर आली आहे. साधारणपणे कोणताही देश डॉकिंग आणि अनडॉकिंगमधील बारीकसारीक गोष्टी शेअर करत नाही. त्यामुळेच भारताला स्वत:चं डॉकिंग मॅकेनिझ्म बनवावे लागले आहे. इस्रो अनेक नवीन मोहिमा आखत असते. अंतराळ क्षेत्रात गेल्या काही वर्षात भारताने अनेक यशस्वी मोहीम केल्या आहेत.
रॉकेटद्वारे लॉन्चः-
अंतराळात स्वत:चे स्पेस स्टेशन बनवणे आणि चंद्रयान-४ च्या यशाचे स्वप्न आता या मिशनवर अवलंबून आहे. या मिशनमध्ये दोन स्पेसक्राफ्ट समाविष्ट आहेत. एकाचे नाव टार्गेट म्हणजे लक्ष्य ठेवले आहे. दुसऱ्याचे नाव चेंजर म्हणजेच पाठलाग करणारा असे ठेवले आहे. दोन्हींचे वजन २२० किलोग्रॅम आहे. पीएसएलव्ही- सी६० रॉकेटने ४७० किमी उंचावर दोन्ही स्पेसक्राफ्ट वेगवेगळ्या दिशेने लॉन्च केले जाणार आहेत. याआधी ही मोहीम अमेरिका, रशिया आणि चीन या देशांनी केली आहे. आता भारत हा ही मोहीम करणार चौथा देश ठरणार आहे.