भागात संचारबंदी लागू
मुंबई : मुंबई : महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यातील पालधी गावात काल रात्री दोन गटात झालेल्या हाणामारीनंतर संचारबंदी लागू करण्यात आली आहे.शिवसेनेचे (शिंदे गट) मंत्री गुलाबराव पाटील यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या गाडीने येथील एका तरुणाला धडक दिल्याने जळगावात हिंसाचार उसळला. प्राथमिक माहितीनुसार, मंगळवारी रात्री साडेनऊ वाजता वादाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि काही वेळातच दगडफेक आणि जाळपोळीचे स्वरूप आले. यावेळी संतप्त जमावाने दुकाने आणि वाहने जाळली तसेच दगडफेक केली.
या घटनेनंतर जळगावातील विविध भागात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी २५ जणांवर गुन्हा दाखल केला असून सुमारे १० जणांना ताब्यात घेतले आहे. खबरदारी म्हणून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. जळगावच्या एएसपी कविता नेरकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, गावात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी बुधवारी सायंकाळपर्यंत संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्याचबरोबर कोणीही कायद्याच्या विरोधात जाऊ नये, असे आवाहन ग्रामस्थांना करण्यात आले. कोणी कायद्याच्या विरोधात गेल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल.
सर्व संवेदनशील ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आहे. पोलिसांकडून सर्व प्रकारच्या हालचालींवर लक्ष ठेवले जात आहे. याप्रकरणी आतापर्यंत २० ते २५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. येथील जिल्हा दंडाधिकारी कार्यालयासमोरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यानजीक ठेवण्यात आलेली संविधानाची प्रत फाडल्याप्रकरणी परभणी शहरात यापूर्वी हिंसाचार उसळला होता.