अर्थरंग : ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात ९ टक्के वाढ; सरकारी तिजोरीत १.८७ लाख कोटींची भर

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
02nd November 2024, 05:34 pm
अर्थरंग : ऑक्टोबरमध्ये जीएसटी संकलनात ९ टक्के वाढ; सरकारी तिजोरीत १.८७ लाख कोटींची भर

नवी दिल्ली : ऑक्टोबर महिन्यात जीएसटीच्या माध्यमातून सरकारी तिजोरीत १.८७ लाख कोटी रुपये आले. ऑक्टोबरमध्ये, जीएसटीचे एकूण महसूल संकलन ८.९ टक्क्यांनी वाढले. गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात सरकारने एकूण १.७२ लाख कोटी रुपये जीएसटीच्या स्वरूपात जमा केले होते. अर्थ मंत्रालयाने शुक्रवारी जीएसटी संकलनाचे हे ताजे आकडे शेअर केले आहेत.

जीएसटी संकलनातील ही वाढ देशांतर्गत व्यवहारातून निर्माण झालेल्या अधिक महसुलामुळे झाली आहे. शुक्रवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात केंद्रीय जीएसटी संकलन ३३,८२१ कोटी रुपये, राज्य जीएसटी संकलन ४१,८६४ कोटी रुपये, इंटीग्रेटेड जीएसटी संकलन ९९,१११ कोटी रुपये आणि उपकर संकलन  १२,५५०  कोटी रुपये होते.

ऑक्टोबर २०२४ मध्ये देशांतर्गत व्यवहारातून जीएसटी संकलन १०.६ टक्क्यांनी वाढून १.४१ लाख कोटी रुपयांवर पोहोचल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.. विशेष म्हणजे ऑक्टोबर २०२४ मध्ये एकूण १९,३०६ कोटी रुपयांचा परतावाही जारी करण्यात आला.  जो गेल्या वर्षीच्या ऑक्टोबर महिन्याच्या तुलनेत १८.२ टक्के अधिक आहे. या कालावधीत, आयातीवरील कर संकलन जवळपास चार टक्क्यांनी वाढून ४५,०९६ कोटी रुपयांवर पोहोचले आहे

हेही वाचा