पणजी बाजारपेठेत भाज्यांच्या दरात किंचित वाढ

कांदा, टोमॅटोचे दर उतरले : पालेभाज्यांचे दर मागील आठवड्याएवढेच

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
21st October, 11:52 pm
पणजी बाजारपेठेत भाज्यांच्या दरात किंचित वाढ

पणजी : गेल्या आठवड्याच्या तुलनेत सोमवारी पणजी बाजारात भाज्यांचे दरात वाढ झाली. काकडीचे दर १० रुपयांनी वाढून ७० रुपये किलो झाले होते. कोबीचे दर १० रुपयांनी वाढून ६० रुपये किलो झाले. गाजराचे दर २० रुपयांनी वाढून १०० रुपये किलो झाले. काकडीचे दर १० रुपयांनी वाढून ७० रुपये किलो झाले. दुधी भोपळ्याचे दर १० रुपयांनी वाढून होऊन ६० रुपये किलो झाले.
सोमवारी पणजी बाजारात बटाट्याचे दर ५० रुपये किलो होते. कांदा आणि टोमॅटोचे दर प्रत्येकी १० रुपयांनी कमी होऊन अनुक्रमे ५० व ७० रुपये किलो झाले. कोथिंबीरचे दर १० रुपयांनी कमी होऊन २० रुपये जुडी झाले. वालपापडीचे दर ४० रुपयांनी कमी होऊन १२० रुपये किलो झाले. ढब्बू मिरचीचे दर मागील आठवड्याप्रमाणेच १२० रुपये किलो होते. आले २०० रुपये तर लसूण ६०० रुपये किलो दराने विकले जात होते.
बाजारात कारले, दोडके, गवार, भेंडी, वांगी प्रत्येकी ८० रुपये किलो दराने विकले जात होते. मध्यम आकाराचा ३ लिंबू २० रुपयांना एक या दराने विकले जात होते. मिरचीचे दर १२० रुपये किलो होते. फ्लॉवरचा एका नग दर ५० ते ६० रुपये होता. शेवगा १६० रुपये किलो होता. नारळाचे दर आकारानुसार ३० ते ४० रुपये होते. तर पुदिनाचे दर ५ रुपयांनी वाढून १५ रुपये जुडी झाले होते.
बाजारात पालेभाज्यांचे दर मागील आठवड्या एवढेच होते. मेथी ३० रु., शेपू २५ रु., तांबडी भाजी १५ रु. तर पालक आणि कांद्याची पात १० रुपये एक जुडी या दराने विकले जात होते. फलोत्पादन मंडळाच्या गाड्यांवर कांदा ५४ रु., बटाटा ४९ रु., टोमॅटो ६५ रु., वालपापडी १२० रु., मिरची ५५ रु., भेंडी ६५ रु., गाजर ६० रु. तर कोबी ३८ रुपये प्रती किलो दराने विकले जात होते. फ्लॉवरच्या एका नगाचा दर ३८ रुपये होता.