गोवा : ‘एस्मा’ आणखी सहा महिन्यांनी वाढवला

आदेश येत्या १० ऑक्टोबरपासून लागू


02nd October, 12:17 am
गोवा : ‘एस्मा’ आणखी सहा महिन्यांनी वाढवला

प्रतिनिधी। गोवन वार्ता
पणजी : फार्मास्युटिकल कंपन्यांमधील कामगारांसाठी राज्य सरकारने लागू केलेला अत्यावश्यक सेवा देखभाल कायदा (एस्मा) आणखी सहा महिन्यांनी वाढवण्यात आला आहे. हा आदेश येत्या १० ऑक्टोबरपासून लागू होणार आहे.
फार्मास्युटिकल कंपन्यांमधील कामगारांनी आंदोलने, मोर्चे काढू नये, यासाठी सरकारने गतवर्षी त्यांच्यासाठी ‘एस्मा’ लागू केला होता. त्यानंतर त्यात वेळोवेळी प्रत्येकी सहा महिन्यांनी वाढ करण्यात येत आहे. याआधी १० एप्रिल २०२४ रोजी कायद्याची मुदत सहा महिन्यांनी वाढवली होती. ‘एस्मा’ लागू करून राज्य सरकार फार्मास्यु​टिकल कंपन्यांतील कामगारांची पिळवणूक करत असल्याचा आरोप कामगार संघटनांकडून होत आहे.