सागर नाईक याच्याविरुद्ध फोंडा पोलिसांत गुन्हा नोंद
फोंडा : उसगाव परिसरातील एका महिलेकडून १५ लाख रुपये घेऊन शिक्षिकेची नोकरी देत असल्याचे सांगत फसवणूक केल्याप्रकरणी फोंडा पोलिसांनी सागर नाईक (नागझर -कुर्टी ) याच्याविरुद्ध गुन्हा नोंद केला आहे. याप्रकरणी फोंडा पोलीस संशयित सागर नाईक याचा शोध घेत आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऑक्टोबर २०२२ पासून माशेल येथे एका हायस्कूलमध्ये शिक्षिकेची नोकरी देण्याचे सांगून एका महिलेकडून १५ लाख रुपये सागर याने घेतले होते. पण रक्कम दिल्यानंतर संशयिताने नोकरी दिली नसल्याने सोमवारी रात्री फोंडा पोलीस स्थानकात तक्रार देण्यात आली. पोलीस निरीक्षक विजयनाथ कवळेकर या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.