पणजी : क्रॉस ड्रेनचे काम प्रलंबित असल्यानेच रायबंदरच्या रस्त्यांच्या दुरुस्तीत अडथळे

महापौर रोहित मोन्सेरात बुधवारी करणार पाहणी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
16th September, 03:21 pm
पणजी : क्रॉस ड्रेनचे काम प्रलंबित असल्यानेच रायबंदरच्या रस्त्यांच्या दुरुस्तीत अडथळे

पणजी : रायबंदर येथील रस्त्यांची दशा आणि दिशा यंदाच्या पावसाळ्यात पूर्णतः बदलल्याने वाहनचालकांना येथून वाट काढताना सर्कस करावी लागते. यावर स्मार्टसिटीचे अभियंते आणि पणजी पालिकेकडे रीतसर तक्रार करूनही काहीच तोडगा निघाला नाही. काल येथील ग्रामस्थांनी एकत्र येत पालिकेचे लक्ष या मुद्यांकडे वेधण्याचा प्रयत्न केला. पणजीहून रायबंदरमार्गे जाणाऱ्या वाहनचालकांचे प्रचंड हाल होत आहेत. ३० सप्टेंबरपर्यंत रस्त्यांची दुरुस्ती न केल्यास रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे



ग्रामस्थांच्या या इशाऱ्याचा परिणाम झाल्याचा दिसत असून, बुधवारी पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात बुधवारी याठिकाणी येत पाहणी करणार आहेत. स्मार्ट सिटी अंतर्गत रायबंदर परिसरात १२ क्रॉस ड्रेन नाल्यांचे काम प्रलंबित आहे. या कामांमुळे सार्वजनिक बांधकाम विभाग रस्त्यांची कामे पूर्ण करू शकत नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.  स्मार्ट सिटी अंतर्गत पणजीच्या इतर भागांसह रायबंदर परिसरात रस्ते आणि मलनिस्सारणाची कामे करण्यात आली. क्रॉस ड्रेन अद्याप पूर्ण व्हायचे आहेत. ते पूर्ण होण्यापूर्वी रस्ते हॉट मिक्स करणे शक्य होणार नाही, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.



स्मार्ट सीटीच्या कामांमुळे रायबंदरचे रस्ते उघडे पडले आहेत. रस्ते नव्याने बांधले असले तरी पावसामुळे खड्डे पडले आहेत. तसेच हॉट मिक्सिंग किंवा फिनिशिंग न केल्यामुळे यासरस्त्यावरून गाड्या गेल्या तर सर्वत्र धूळ पसरते. रायबंदरमधील रस्त्यांच्या प्रश्नावर मी स्मार्ट सिटी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाशी बोललो आहे. क्रॉस ड्रेनच्या प्रलंबित कामांमुळेच रस्त्यांची दुरुस्ती करण्यात अडथळा येत आहे. बुधवारी मी रस्त्यांची पाहणी करणार आहे. रायबंदरमधील रस्त्यांच्या दुरवस्थेला स्मार्ट सिटी जबाबदार आहे. पणजी महानगरपालिका काही करू शकत नाही,” असे महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले.


हेही वाचा