मुख्य माहिती आयुक्त अरविंद कुमार नायर, राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे शपथबद्ध

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
18th September, 12:00 am
मुख्य माहिती आयुक्त अरविंद कुमार नायर, राज्य माहिती आयुक्त आत्माराम बर्वे शपथबद्ध

पणजी : राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून अरविंद कुमार नायर तर राज्य माहिती आयुक्त म्हणून आत्माराम बर्वे यांनी राजभवनात शपथ घेतली. राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी अरविंद कुमार नायर आणि आत्माराम बर्वे यांना शपथ दिली. राजभवनात शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत, वाहतूक मंत्री मॉविन गुदिन्हो, पर्यावरण मंत्री ॲलेक्स सिक्वेरा, आमदार राजेश फळदेसाई, आमदार उल्हास तुयेकर आणि सरकारी अधिकारी उपस्थित होते. माहिती खात्याचे संचालक दीपक बांदेकर यांनी प्रारंभी मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्तांच्या नियुक्तीच्या आदेशाचे वाचन केले. ही नियुक्ती तीन वर्षांच्या कालावधीसाठी आहे.

२ मार्च २०२४ पासून मुख्य माहिती आयुक्त आणि राज्य माहिती आयुक्त ही पदे रिक्त होती. ॲड. विश्वास सतरकर आणि संजय ढवळीकर यांचा कार्यकाळ संपल्याने ही दोन्ही पदे रिक्त होती. दोन्ही पदे रिक्त असल्याने माहिती आयोगाचे काम अक्षरश: ठप्प झाले होते. दोन्ही पदांसाठी नियुक्ती झाल्याने आता तक्रारी आणि याचिकांवर सुनावणी सुरू होणार आहे.

हेही वाचा