गोवा पुन्हा बनणार पर्यटकांच्या गळ्यातील ताईत; लवकरच मिळणार नवीन क्रुज टर्मिनल

अहवालानुसार भारतात येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी सुमारे २० टक्के पर्यटकांची पहिली पसंती गोवा आहे. येत्या काळात यात वाढ होण्याची चिन्हे दिसत असून गोवा सरकार आणि पर्यटन खाते यावर काम करत आहेत.

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
16th September, 10:47 am
गोवा पुन्हा बनणार पर्यटकांच्या गळ्यातील ताईत; लवकरच मिळणार नवीन क्रुज टर्मिनल

पणजी : गोव्याच्या मुरगाव बंदर प्राधिकरणाने (एमपीए) मार्च २०२५  पर्यंत गोव्यात आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत प्रवासी टर्मिनल बांधण्याची घोषणा केली आहे. २०२३-२४ या वर्षात क्रूझ प्रवाशांच्या संख्येत ४०  टक्क्यांनी वाढ अपेक्षित आहे आणि ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.  एमपीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले की, आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल्स आणि संबंधित सुविधांच्या विकासामुळे पर्यटन तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.


Major cruise liners gear up to set sail into Mormugao Port – The Navhind  Times


१२ आणि १३ सप्टेंबर रोजी गोव्यात झालेल्या सागरी राज्य विकास परिषदेच्या बैठकीदरम्यान, एमपीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, जागतिक क्रूझ जहाज वाहतुकीतील तेजीमुळे मुरमुगाव बंदरात क्रूझ जहाजांची आवक झपाट्याने वाढली आहे आणि भविष्यात त्यात लक्षणीय वाढ होण्याची अपेक्षा आहे.  बैठकीत केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी प्रस्तावित अत्याधुनिक इमारतीला भेट दिली. या इमारतीत आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत क्रूझ टर्मिनल असतील. अधिकाऱ्याने सांगितले की, 'येथे प्रवाशांची विशेष काळजी घेतली जाईल. या आंतरराष्ट्रीय क्रूझ टर्मिनलमध्ये २४ इमिग्रेशन काउंटर, १० चेक-इन काउंटर, एक वेटिंग लाउंज आणि इतर सुविधा असतील. टर्मिनलमध्ये ड्युटी फ्री रिटेल शॉप, लाउंज, फूड कोर्ट आणि इतर सुविधाही असतील.

Mormugao Port heading for 20% jump in cargo, tourist movement' - The  Navhind Times


येथील पर्यटन उद्योगाला कोरोनामुळे संकटाचा सामना करावा लागला. पर्यटकांच्या संख्येतही ९०  टक्क्यांहून अधिक घट नोंदवली गेली. यानंतर गोवा सरकारच्या पर्यटन विभागाने कोविड-१९ महामारीवर मात करण्यासाठी 'आंतरराष्ट्रीय चार्टर सहाय्य', 'पर्यटन व्यापार सहाय्य' अशा अनेक योजना सुरू केल्या. या सर्व सरकारी प्रयत्नांनंतर येथील समुद्रकिनारे पुन्हा एकदा देशी-विदेशी पाहुण्यांनी गजबजलेले दिसू लागले आहेत. २०२२-२३ च्या तुलनेत २०२३-२४ मध्ये येथे येणाऱ्या क्रूझ जहाजांच्या संख्येत १५ टक्के आणि क्रूझ प्रवाशांच्या संख्येत ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे.


A Quick Guide to Goa Tour: Best Things to Do in Goa - India Travel Blog


पर्यटन हा गोव्याच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार आहे. अहवालानुसार भारतात येणाऱ्या एकूण पर्यटकांपैकी सुमारे २० टक्के पर्यटकांची पहिली पसंती गोवा आहे. सरकारी आकडेवारीनुसार, जानेवारी-नोव्हेंबर २०२३ दरम्यान ४.०३ लाख परदेशी पर्यटक गोव्यात आले. त्याच वेळी, गोवा सरकारच्या पर्यटन विभागानुसार, २०१९ मध्ये सुमारे ७१ लाख देशी पर्यटक आणि सुमारे १० लाख विदेशी पर्यटक गोव्यात आले होते. २०२० पासून, कोरोनामुळे गोव्याच्या पर्यटनावर खूप वाईट परिणाम दिसून आला, परंतु गेल्या ४ वर्षांपासून मंदीशी झुंजत असलेल्या गोव्याच्या पर्यटन उद्योगात देशी-विदेशी पाहुण्यांचा ओघ आता झपाट्याने वाढला आहे. हे पाहता हे क्रूझ टर्मिनल बांधण्यावर भर देण्यात आला असून ते पुढील वर्षी पूर्ण होईल.

Best Tourist Places to Visit in Goa


हेही वाचा