इंदूर : पिकनिकसाठी गेलेल्या लष्कराच्या २ जवानांवर हल्ला; महिला साथीदारावर सामूहिक बलात्कार

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
12th September, 01:29 pm
इंदूर : पिकनिकसाठी गेलेल्या लष्कराच्या २ जवानांवर हल्ला; महिला साथीदारावर सामूहिक बलात्कार

इंदूर : विकृत मानसिकता समाजात भिनली आहे. काही लोकांच्या मनात खोलवर रुजलेली ही विकृती वेळोवेळी आपले अस्तित्व दाखवून देते. गेल्या काही काळात देशभरात अशाच पाशवी मानसिकतेच्या भक्ष्यस्थानी पडलेल्यांची संख्या पाहून मन हेलावून जाते. असाच एक प्रकार आता इंदूर येथून समोर आला आहे.  शहरापासून ५० किलोमीटर अंतरावर असलेल्या ऐतिहासिक जाम गेटजवळ दोन प्रशिक्षणार्थी लष्करी सैनिक आपल्या दोन महिला साथीदारांसह नाईट ड्राईव्ह आणि पिकनिकला आले होते. जाम गेटजवळ लष्कराची जुनी फायरिंग रेंज असून, तेथे रात्री उशिरापर्यंत हे चौघे बसले होते. यावेळी सुमारे ६ बदमाशांनी तेथे येऊन चौघांनाही ओलीस ठेवले, मारहाणही केली त्यांना लुटले. 

जाम गेट पर आर्मी के अफसर और उनकी महिला मित्रों के साथ लूट की वारदात हुई है। - Dainik Bhaskar

याच काळात एका महिला साथीदारावरही बंदुकीच्या धाकावर सामूहिक बलात्कार करण्यात आला. पीडितांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (११  सप्टेंबर) उत्तररात्री २:३५ वाजण्याच्या सुमारास चार मित्र फायरिंग रेंजजवळ बसले होते. तेथे ६  बदमाशांनी येऊन त्यांना मारहाण केली, त्यांच्या महिला साथीदारांनाही मारहाण केली आणि १० लाख रुपयांची मागणी केली. 

ताजनगरी हुई शर्मसार 24 घंटे में सामूहिक दुष्कर्म की दो वारदातें - Pragya  News 24

यानंतर आरोपींनी एक सैनिक आणि त्याच्या महिला साथीदाराला ओलीस ठेवले. त्याचवेळी आणखी एक सैनिक आणि त्याच्या महिला साथीदाराला १० लाख रुपये आणण्यासाठी पाठवण्यात आले. ओलीस ठेवलेल्या महिला साथीदारावर बंदुकीच्या धाकावर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याचा आरोप आहे. 

रुद्रपुर में कोलकाता जैसी वारदात, नर्स के साथ रेप फिर गला घोंटकर मौत के घाट  उतारा | Jansatta

मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी प्रकरणाची गंभीर दखल घेत एफआयआर दाखल केला आहे . काही पुरावे गोळा केले जात आहेत. पुराव्याच्या आधारे कठोर कारवाई केली जाईल. पोलिसांनी सांगितले की, प्राथमिक पुराव्यानुसार काही लोकांची ओळख पटली आहे. काही आरोपींची नावेही समोर आली आहेत. लवकरच त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली जाईल. दरम्यान या प्रकरणात आतापर्यंत दोघा आरोपींना अटक करण्यात आली आहे. मात्र, लवकरच उर्वरीत आरोपींचा शोध घेऊन कडक कारवाई केली जाईल, असा पोलिसांचा दावा आहे. 

हेही वाचा