कांदोळी : सोमवारी बामणवाडा येथील एक बंगल्यात रॉबर्ट डायस या ५७ वर्षीय व्यक्तीचा संशयास्पद मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली आहे. या बंगल्यातून काही तरी कुजल्यासारखा वास येत असल्याने शेजाऱ्यांनी कळंगूट पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली व दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. त्यात यश न आल्याने त्यांनी सायंकाळी ६.४५ वाजता पिळर्ण अग्निशामक दलाशी संपर्क साधला.
दरम्यान पिळर्ण अग्निशामक दलाने तत्काळ घटनास्थळी दाखल होत पाहणी केली. सर्वप्रथम त्यांनी बंगल्याचे दार उघडण्याचा प्रयत्न केला पण त्यात यश आले नाही. यानंतर त्यांनी गॅलरीतून आत जाण्याचा प्रयत्न केला, तेही बंद अवस्थेत आढळले. हायड्रोलिक डोर ब्रेकरच्या मदतीने त्यांनी दार उघडले. दरवाजामागेच खाली जमिनीवर त्यांना ५७ वर्षीय रॉबर्ट डायस यांचा मृतदेह आढळून आला. अग्निशामक दलाने डायस यांचा मृतदेह कळंगूट पोलिसांकडे सुपूर्द केला. कळंगूट पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह गोमेकॉत पाठवला. याप्रकरणी अनैसर्गिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून विविध अंगाने पुढील तपास सुरू आहे.
बातमी अपडेट होत आहे