पणजी : अॅपलचा स्वतचा असा वेगळा चाहता वर्ग आहे. वापरकर्ते २०२४ मध्ये आयफोन १६ सिरिजची वाट पाहत होते. यावेळी कंपनीने ९ सप्टेंबरला नवीन आयफोन सादर केला आहे. दरवेळेप्रमाणेच नव्या आयफोनसोबत जुन्या आयफोनची किंमतही कमी होणार आहे. अशा परिस्थितीत आयफोन खरेदी करण्याची हीच योग्य वेळ असेल. जर तुम्ही देखील आयफोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही नवीन आयफोन ऐवजी आयफोन १५ वर पैसे गुंतवू शकता. मग जाणून घेऊयात नवी सिरिज नावीन्य घेऊन आली आहे की अॅपलने नव्या बाटलीत जुनीच दारू भरली आहे.
कंपनीचे म्हणणे आहे की आयफोन १६ मध्ये यूजर्सना उत्तम स्क्रीन प्रोटेक्शन देण्यात आले आहे. तुम्हाला iPhone 16 मध्ये ६.१ -इंच डिस्प्ले आणि iPhone 16 Plus मध्ये ६.७ -इंचाचा डिस्प्ले मिळेल. स्क्रीन ब्राइटनेस २००० निट्स आहे.
यंदा कंपनीने कॅमेरा मॉड्यूलमध्ये बदल केले आहेत. म्हणजेच या फोनमध्ये तुम्हाला नवीन डिझाईन मिळेल. विशेष म्हणजे याचा कॅमेरा मॉड्यूल काहीसा सॅमसंगच्या कॅमेरा मॉड्यूलसारखा दिसतो. कंपनीने यामध्ये पिलच्या आकाराचा डिस्प्ले दिला आहे. यामध्ये तुम्हाला नवीन कॅमेरा कॅप्चर बटण देखील मिळेल. कंपनी ॲपल इंटेलिजन्सला सॉफ्टवेअर अपडेटसह सपोर्ट करेल. सध्या ही अपडेट फक्त इंग्रजी भाषेत लॉन्च केले जात आहे, परंतु इतर भाषांसाठी देखील लवकरच अपडेट्स दिली जातील.
स्मार्टफोनमध्ये A18 चिपसेट देण्यात आला आहे. कंपनीचे म्हणणे आहे की हा प्रोसेसर केवळ स्मार्टफोनशीच नाही तर अनेक डेस्कटॉपशीही स्पर्धा करू शकतो. यामध्ये तुम्हाला चांगली बॅटरीही मिळेल. यामध्ये तुम्हाला Apple Intelligence चे फीचर मिळेल. कंपनीचे म्हणणे आहे की हे फीचर जोडताना गोपनीयतेची विशेष काळजी घेण्यात आली आहे. यामध्ये प्रायव्हेट क्लाऊड कॉम्प्युटचा वापर करण्यात आला आहे, यामुळे युजर्सना चांगली सुरक्षा मिळेल. यासोबत कंपनीने व्हिज्युअल इंटेलिजेंसचे फीचर दिले आहे, याच्या मदतीने तुम्ही कॅमेरा वापरून एका क्लिकवर बरीच माहिती मिळवू शकाल. नवीन कॅमेरा अपडेटनंतर, तुम्ही लँडस्केप आणि व्हर्टिकल दोन्ही मोडमध्ये सहज फोटो क्लिक करू शकाल.
यामध्ये तुम्हाला क्लिक अँड होल्ड करून व्हिडिओ रेकॉर्डिंगचा पर्याय मिळेल. कॅमेरा अॅक्सेस करण्यासाठी तुम्ही कॅप्चर बटण देखील वापरू शकता. स्मार्टफोनमध्ये 48MP मुख्य लेन्ससह ड्युअल कॅमेरा सेटअप उपलब्ध असेल. सेकंडरी लेन्स 12MP आहे. यात ट्रू डेप्थ फ्रंट कॅमेरा असेल. यामध्ये तुम्हाला सॅटेलाइट कनेक्टिव्हिटीची सुविधाही मिळेल. मात्र, हे फीचर भारतात येणार नाही. यामध्ये कंपनीने ॲक्शन बटण देखील दिले आहे, जे आधी फक्त प्रो मॉडेलमध्ये उपलब्ध होते. हे स्मार्टफोन टाइप-सी चार्जिंग पोर्टसह येतील. तुम्हाला वायरलेस चार्जिंग देखील मिळेल.
किंमत किती आहे?
iPhone 16 ची किंमत ७९९ डॉलर्स (जवळपास ६७ हजार रुपये) पासून सुरू होईल. ही किंमत 128GB स्टोरेजसाठी आहे. तर iPhone 16 Plus ची किंमत ८९९ डॉलर्स (अंदाजे रु ७५,०००) पासून सुरू होईल, ही 128GB स्टोरेज वेरिएंटची किंमत आहे. मात्र भारतात यांची किमत किती असे ही अद्याप स्पष्ट करण्यात आले नाही. महत्त्वाचे म्हणजे अॅपल आयफोन १६ सिरिजमध्ये देण्यात आलेले काही फीचर्स अँन्ड्रॉईड फोन्समध्ये आधी पासूनच उपलब्ध होते.