चक्क हवेतून लायटरची डिलिव्हरी: गोव्यात पॅराग्लायडिंग करणाऱ्याच्या कृतीने नेटकरी चक्रावले

मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर होत आहे तुफान व्हायरल

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
11 hours ago
चक्क हवेतून लायटरची डिलिव्हरी: गोव्यात पॅराग्लायडिंग करणाऱ्याच्या कृतीने नेटकरी चक्रावले

गोवा हे पर्यटकांच्या पसंतीस उतरलेले राज्य आहे. देशविदेशातील पर्यटक गोव्याच्या निसर्गाच्या प्रेमात पडून याठिकाणी भटकंतीसाठी येतात. याच विषयाच्या अनुषंगाने एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय.

"गोवा नवशिक्यांसाठी नाही,'' अशा प्रकारचे कॅप्शन देत एका एक्स (पूर्वीचे ट्विटर) वापरकर्त्याने एक गंमतीशीर व्हिडीओ व्हायरल केलाय.  या फुटेजमध्ये एक महिला समुद्र आणि सूर्यास्ताच्या विहंगम क्षणी  पॅराग्लायडिंग करताना दिसत आहे. पर्यटकांचा एक गट त्या महिलेला उद्देशून ''लाईटर है?" असे विचारतो. 

त्यानंतर पॅराग्लायडिंग करणारी महिला हवेतून खाली येते आणि खाली असलेल्या व्यक्तीला लाईटर देते. या क्षणाचा अनपेक्षित विनोद त्या व्हिडिओमध्ये कैद झाला आहे.

 "भारत नवशिक्यांसाठी नाही" असे कॅप्शन असलेल्या या व्हिडिओमध्ये "देव आकाशातून देवदूत पाठवतो" असे लिहिलेले मजकूर देखील समाविष्ट आहे. हा व्हिडीओ एक्सवर तुफान व्हायरल झाला, असून या व्हिडिओवर प्रतिक्रियांची जणू लाटच आली आहे. 

हेही वाचा