शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात

निफ्टीमध्ये जवळपास १२० अंकांची वाढ

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात

मुंबईः देशांतर्गत शेअर बाजारात सोमवारच्या मोठ्या घसरणीनंतर मंगळवारी जागतिक बाजारातून सकारात्मक संकेत मिळाले. बाजाराची आज जोरदार सुरुवात झाली. सेन्सेक्स ३५० अंकांनी वधारत होता.

त्यामुळे निफ्टीमध्ये जवळपास १२० अंकांची वाढ झाली. बँक निफ्टीमध्ये ४०० अंकांची वाढ झाली. बीईएल, एनटीपीसी, एसबीआय या शेअर्समध्ये वाढ झाली. इंडसइंड बँक, ॲक्सिस बँक या शेअर्समध्येही वाढ झाली.

आशियाई बाजारात आज संमिश्र व्यवहार दिसून येत आहे. गिफ्ट निफ्टीमध्ये १०० अंकांची वाढ होत आहे. Nikkei सुमारे २.२१ टक्क्यांनी घसरताना दिसत आहे. त्याच वेळी, स्ट्रेट टाइम्समध्ये ०.०७ टक्के घसरण होत आहे. तैवानचा बाजार ०.८९ टक्क्यांनी वाढून २२,६८९. ०० वर व्यापार करत आहे.

तर हँग सेंग १.४० टक्क्यांनी वाढून १९,१३८.७२ च्या पातळीवर दिसत आहे. कोस्पी ०.१६ टक्क्यांच्या वाढीसह व्यवहार करत आहे. शांघाय कंपोझिट ३,२१६.०० च्या पातळीवर १.७२ टक्के वाढीसह व्यवहार करत आहे.

वाढ आणि घसरण -

निफ्टीमध्ये आजच्या व्यवहारात NTPC, Tata Motors, Hindalco, Bajaj Finance, SBI या शेअर्समध्ये सर्वाधिक तेजी दिसून आली, तर HCL Tech, Tech Mahindra, HUL, TCS, Apollo Hospitals यांचे शेअर्स सर्वाधिक घसरले.

हेही वाचा