बेळगाव : कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात

चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने घडली घटना

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
12 hours ago
बेळगाव :  कर्नाटकच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या वाहनाला अपघात

बेळगाव : कर्नाटक राज्याच्या महिला व बालकल्याण विभागाच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या गाडीला भीषण अपघात झाला. बंगळुरूहून बेळगावला येत असताना आज सकाळी ६ च्या दरम्यान हा अपघात घडला. 


सीएलपीच्या बैठकीनंतर रात्री उशिरा बंगळुरूहून बेळगावला येत असताना कित्तूरजवळील अंबरगट्टीजवळ एक श्वान रस्त्यावर आडवा आला.  त्याला वाचवण्याच्या नादात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने कार झाडावर आदळली. 

हेब्बाळकर यांच्या पाठीला आणि चेहऱ्याला किरकोळ दुखापत झाली असून चन्नराज हत्तीहोली यांच्या डोक्याला दुखापत झाली आहे. दोघांवरही बेळगाव येथील एका खाजगी रुग्णालयात  उपचार सुरू असल्याची माहिती मिळाली आहे. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, धडकेमुळे कारचा दर्शनीभागाचे नुकसान झाले आहे. 

हेही वाचा