रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स नावेलीतर्फे स्पर्धेचे आयोजन
पणजी : सेंट जोसेफ वाझ महाविद्यालय कुठ्ठाळीने गोवा विद्यापीठाच्या पुरुषांसाठीच्या आंतरमहाविद्यालयीन सायकलिंग चॅम्पियनशिपचे विजेतेपद पटकावले. स्पर्धा रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स नावेलीने गोवा विद्यापीठाच्या सहकार्याने नावेली येथे आयोजित केली होती.
रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स नावेलीने दुसऱ्या क्रमांकाचे स्थान पटकावले आणि सरकारी कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालय केपेने तिसरे स्थान पटकावले. ३५ किलोमीटरच्या सायकलिंग शर्यतीत गोव्यातील महाविद्यालयांतून ५५ स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
वैयक्तिक गटातील विजेते
वैयक्तिक गटात सर्व पोडियम फिनिशर्स सेंट जोसेफ वाझ कॉलेज कुठ्ठाळीचे होते. यात दिशांत काणकोणकर (००:५५:५०); उमेश गणी (००:५६:१०) आणि शुभम गावस (०१:०१:३४) यांनी अनुक्रमे पहिले, दुसरे आणि तिसरे स्थान पटकावले.
समारोप समारंभाचे प्रमुख पाहुणे दक्षिण गोवा येथील वाहतूक शाखेचे उपअधीक्षक राजेंद्र प्रभुदेसाई आणि रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, नावेलीचे प्राचार्य प्रा. हेलिक बॅरेटो यांच्यासह रोझरी कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स, नावेलीचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा संचालक डॉ. फ्रान्सिस लोबो, गोवा विद्यापीठाचे शारीरिक शिक्षण आणि क्रीडा सहाय्यक संचालक बालचंद्र जादर, कॉलेज डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन अँड स्पोर्ट्स, व्हीव्हीएमचे गोविंद रामनाथ करे कॉलेज ऑफ लॉ, मडगाव मनोज हेदे, माजी महाविद्यालयीन संचालक, शारीरिक शिक्षण, डॉन बॉस्को कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग आवेर्तान बार्रेटो आणि गोवा विद्यापीठाचे सहाय्यक क्रीडा अधिकारी अवीध मोरजकर यांनी या कार्यक्रमाची शोभा वाढवली आणि विजेत्यांना पदके आणि ट्रॉफी प्रदान केल्या.