सूरत : गणेशोत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न; गणेश मंडपावर दगडफेक, ३३ जण अटकेत

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
09th September 2024, 12:31 pm
सूरत : गणेशोत्सवात विघ्न आणण्याचा प्रयत्न; गणेश मंडपावर दगडफेक, ३३ जण अटकेत

सूरत : गुजरातमधील सूरतमधील सय्यदपुरा भागातील गणेश पूजा मंडपावरवर एका समुदायाच्या काही अल्पवयीन मुलांनी दगडफेक केल्याने शहरात सांप्रदायिक तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी पोलिसांनी दगडफेक करणाऱ्या सहाही अल्पवयीनआरोपींना अटक केली आहे. दरम्यान, इतर २७ जणांनाही अटक करण्यात आली आहे. या घटनेनंतर परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेनंतर स्थानिक लोकांच्या संतप्त जमावाने  पोलीस स्थानकाच्या परिसरात प्रचंड तोडफोड केली आणि गोंधळ घातला. 


Surat में गणेश पंडाल पर पथराव, 6 साजिशकर्ता समेत 33 लोग गिरफ्तार; आक्रोशित  लोगों ने किया पुलिस चौकी का घेराव - Surat Stone Pelting Stone pelting at  Ganesh pandal in Surat 6


समोर आलेल्या माहितीनुसार सुरत जिल्ह्यातील सय्यदपुरा भागात सोमवारी पहाटे काही अल्पवयीन मुलांनी गणेश पूजा मंडपावर दगडफेक केल्याने तणाव निर्माण झाला. यानंतर हजारो स्थानिक नागरिकांनी स्थानिक पोलीस स्थानक गाठून आरोपींवर कारवाईची मागणी केली. घटनेची माहिती मिळताच मोठा पोलीस बंदोबस्त घटनास्थळी पोहोचला आणि परिस्थिती नियंत्रणात आणली. संतप्त जमावाला नियंत्रित करण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज आणि अश्रुधुराचाही वापर केला. या प्रकरणाची माहिती मिळताच गुजरातचे गृहमंत्री हर्ष संघवी यांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला आणि पोलिसांना या घटनेत सहभागी असलेल्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले. सुरतमधील शांतता बिघडवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, ज्यांनी गणेश पंडालवर दगडफेक केली आणि दर्शन घेण्यापूर्वीच किरणची दिशाभूल केली त्यांना अटक केली जाईल, असे त्यांनी स्थानिकांना संबोधित करतांना म्हटले. 


दरम्यान काही मुलांनी गणेश मंडपावर दगडफेक केल्यानंतर दोन गटात हाणामारीही झाली. पोलिसांनी त्या मुलांना ताबडतोब तेथून हटवले. पोलिसांनी तात्काळ लाठीचार्जही केला. परिसरात सुमारे १ हजार पोलीस तैनात करण्यात आले होते आणि नागरिक देखील उपस्थित होते.

हेही वाचा