हिंडेनबर्ग रिसर्चने पुन्हा लगावले आरोप
नवी दिल्ली : गेल्या वर्षी अदानी समूहाला लक्ष्य करणाऱ्या हिंडेनबर्गने यावेळी थेट शेअर बाजार नियंत्रक ‘सेबी’वरच हल्ला चढवला आहे. सेबीच्या अध्यक्षा माधबी पुरी बुच याही अदानी समूहाशी संबंधित असल्याचे हिंडनबर्ग अहवालात नमूद करण्यात आले आहे. यामुळेच त्यांनी १८ महिन्यांत अदानी समूहावर कारवाई केली नाही असा आरोप हिंडेनबर्ग रिसर्चने लगावला.
कथित अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती, असे तथाकथित गुप्त दस्तऐवजाचा हवाला देत हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला आहे.
सीक्रेट कागदपत्रांचा हवाला देत हिंडेनबर्ग रिसर्चने आरोप केला की, अदानी घोटाळ्यात वापरल्या गेलेल्या ऑफशोअर संस्थांमध्ये सेबीच्या अध्यक्षांची हिस्सेदारी होती. एप्रिल २०१७ ते मार्च २०२२ या काळात माधबी पुरी बुच सेबीच्या पूर्णवेळ सदस्याशिवाय त्या अध्यक्षाही होत्या. सिंगापूरमधील अगोडा पार्टनर्स नावाच्या कंसल्टिंग फर्ममध्ये त्यांची १०० टक्के भागीदारी होती. १६ मार्च २०२२ रोजी सेबी चेअरपर्सन म्हणून त्यांची नियुक्ती होण्याच्या दोन आठवड्यांपूर्वी त्यांनी कंपनीतील त्यांचे शेअर्स पतीच्या नावावर हस्तांतरित केले, असा आरोप हिंडेनबर्गने लगावला.
हिंडेनबर्गने शनिवारी सकाळीच त्यांच्या सोशल मीडियावर भारतात काहीतरी मोठे घडणार आहे असा दावा केला होता. त्यानंतर पुन्हा एकदा अदानी ग्रुप हिंडेनबर्ग यांच्या निशाण्यावर आला आहे. जानेवारी २०२३ मध्ये गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुप कंपन्याबाबत हिंडेनबर्गने एक रिपोर्ट आणला होता.