पानसरे खूनप्रकरण : संशयित समीर गायकवाडचे निधन; मंजूर झाला होता जामीन

Story: वेब डेस्क। गोवन वार्ता |
2 hours ago
पानसरे खूनप्रकरण : संशयित समीर गायकवाडचे निधन; मंजूर झाला होता जामीन

सांगली : पुरोगामी चळवळीतील नेते गोविंद पानसरे (Govind Pansare)  खूनप्रकरणातील (Murder) संशयित आरोपी समीर गायकवाड याचे सांगलीतील (Sangli) राहत्या घरी निधन झाल्याची माहिती पुढे आली आहे.  सत्र न्यायालयाकडून समीर याला सशर्त जामीन मंजूर झाला होता. ह्रदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याची माहिती आहे.

कोल्हापूर (Kholapur) येथे १६ फेब्रुवारी २०१५ रोजी गोविंद पानसरे याची हत्या झाली होती. याप्रकरणात समीर गायकवाड याला संशयित म्हणून अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्याची जामीनावर सुटका झाली होती व तो सांगलीत राहत होता. 

ह्रदयविकाराचा झटका आल्यानंतर त्याला हॉस्पिटलात नेण्यात आले. मात्र, उपचार मिळण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. समीर गायकवाडचा मृतदेह सांगलीतील सिव्हील हॉस्पिटलात ठेवण्यात आला आहे. पानसरेंच्या खूनप्रकरणानंतर समीर याला सात मह‌िन्यानंतर अटक करण्यात आली होती. त्यानंतर एसआयटीने त्याच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले होते. नंतर समीर याला कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाने सशर्त जामीन मंजूर केला होता. 

हेही वाचा