
मुंबई : महाराष्ट्रातील (Maharashtra) २९ महानगरपालिकांच्या (Muncipal Corporation) निवडणुकांमध्ये (Election) भारतीय जनता पार्टीने (BJP) एकतर्फी विजय मिळवल्यानंतर आता रसगुल्ला ट्रेंड सुरू झाला आहे. हरियाणा निवडणुकीनंतर जिलेबी ट्रेंड सुरू झाला होता. आता रसगुल्ला ट्रेंड का? हा प्रश्न आपल्याला पडला असेल.
भाजपच्या मोठ्या विजयानंतर हा ट्रेंड सुरू झाला आहे. त्याचे कारण भाजपचे तामिळनाडूचे (Tamil नेते अण्णामलाई व मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्यामध्ये निवडणूक प्रचाराच्या वेळी झालेल्या शाब्दिक चकमकीतून आता निकालानंतर रसगुल्लाचा ट्रेंड सुरू झाला आहे. भाजपने हा विजय रसगुल्ला वाटून साजरा करावा, अशी चर्चा सोशल मिडियावर सुरू आहे. आणि रसगुल्ला, मनसे प्रमुख राज ठाकरे आणि भाजन नेते अण्णामलाई यांचा उल्लेख करणाऱ्या पोस्ट्सचा पूर आला. अनेक वापरकर्त्यांनी राजकारणी आणि मिठाई दाखवणारे एआय-निर्मित फोटो आणि व्हिडिओ वापरले.
सोशल मीडियावरील दाव्यानुसार, काही उत्साही भाजप कार्यकर्ते तर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि मनसेच्या नेत्यांना रसगुल्ल्याचे बॉक्स पाठवत आहेत. निवडणुकीच्या प्रचारात राज ठाकरे यांनी मराठी एकतेसाठी पाठिंबा मिळवताना आणि स्थानिक प्रश्नांमध्ये बाहेरील लोकांच्या हस्तक्षेपावर टीका करताना, ठाकरे यांनी मुंबईतील अण्णामलाई यांच्या उपस्थितीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करून म्हटले होते की, “तामिळनाडूतून एक रसगुल्ला मुंबईत आला आहे.” तसेच “हटाओ लुंगी, बजाओ पुंगी” सारख्या घोषणाही दिल्या होत्या. त्यावरूनच आता रसगुल्लाचा ट्रेंड सोशल मीडीयावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.