दक्षिण आशियाई लाठी चॅम्पियनशिपमध्ये गोव्याचे यश

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
08th August 2024, 12:22 am
दक्षिण आशियाई लाठी  चॅम्पियनशिपमध्ये गोव्याचे यश

सुवर्ण पदक विजेता प्रियांश कुडव.

पणजी : थिम्पू, भूतान येथे आयोजित दुसऱ्या दक्षिण आशियाई लाठी स्पोर्ट्स चॅम्पियनशिपमध्ये गोवा युवा स्पोर्ट्स क्लब आणि लाठी असोसिएशन ऑफ गोव्याच्या विद्यार्थ्यांनी भारतासाठी एकूण ९ पदके पटकावली. यात प्रियांश कुडव, केतन गोलतेकर, लक्षित प्रजापती, श्रीयांश आरोंदेकर, कनीश गोलतेकर, शिवम साळगावकर यांना पदके प्राप्त झाली. ही स्पर्धा ४ आणि ५ ऑगस्ट दरम्यान थिम्पू, भूतान येथे आयोजित करण्यात आली होती.             

सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे :            

प्रियांश कुडव : एकेरी लाठी- सुवर्ण,दुहेरी लाठी-सुवर्ण, केतन गोलतेकर: एकेरी लाठी - कांस्य, दुहेरी लाठी - रौप्य, लक्षित प्रजापती: दुहेरी लाठी -रौप्य, श्रीयांश आरोंदेकर : एकेरी लाठी - कांस्य, दुहेरी लाठी - कांस्य,  कनीश गोलतेकर: एकेरी लाठी - कांस्य, शिवम साळगावकर : दुहेरी लाठी- कांस्य.