कुर्टी येथील गोवा डेअरीच्या वाहनावर कोसळलेले आंब्याचे झाड.
फोंडा : गोवा डेअरीत पार्क केलेल्या टेम्पो व रिक्षावर सोमवारी सकाळी ८.३० वाजण्याच्या सुमारास आंब्याचे झाड कोसळले. त्यावेळी बाजूला विनावापर असलेली अन्य तीन वाहने सुरक्षित राहिली. फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड बाजूला केले.
सोमवारी सकाळी सुरू झालेल्या पावसात गोवा डेअरीच्या कार्यालयाजवळ पार्क केलेल्या वाहनावर आंब्याचे झाड कोसळले. सदर झाड जीए-०५-टी-३३८५ क्रमांकाचा टेम्पो व जीए-०५-टी-१४६५ क्रमांकाच्या रिक्षावर कोसळल्याने नुकसान झाले. तर परिसरात बंद स्थितीत असलेली अन्य ३ वाहने सुरक्षित राहिली. माहिती मिळाल्यावर फोंडा अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन झाड बाजूला केले.