दाट धुके, पावसामुळे मडगाव - बेळगाव बस अनमोड घाटात कलंडली

Story: वार्ताहर। गोवन वार्ता |
04th July, 11:48 pm
दाट धुके, पावसामुळे मडगाव - बेळगाव बस अनमोड घाटात कलंडली

जोयडा : अनमोड घाटात पावसाचा जोर व मोठ्या प्रमाणात धुके पडल्याने समोरच्या रस्त्याचा अंदाज न आल्याने मडगाव-बेळगाव बस घाटात कलंडली. अनमोड आरटीओ चेकनाक्याजवळ बस रस्त्याबाहेर गेल्याने अपघात घडला. सुदैवाने मोठी दुर्घटना घडली नाही.

केए २२ एफ २३०१ क्रमांकाची बस मडगाव येथून ४० पेक्षा अधिक प्रवासी घेऊन अनमोड घाटमार्गे बेळगावला गुरुवारी संध्याकाळी जात होती. ही बस अनमोड घाट चढून आरटीओ चेकपोस्टच्या पुढे आली असता समोर असलेल्या दाट धुक्यामुळे चालकाला रस्त्याचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्याचा बसवरचा ताबा सुटून बस रस्त्याच्या बाहेर गेली व एका झाडाला धडकली. मात्र, त्यात कोणतीही हानी झाली नाही. चालक आणि प्रवासी सुखरूप असून त्यांनी नंतर दुसऱ्या बसमधून प्रवास केला. 

हेही वाचा