दोन विद्यार्थ्यांची हाणामारी पाहून विद्यार्थिनीला आली चक्कर...

डिचोलीतील एका उच्च माध्यमिक विद्यालयाबाहेरील प्रकार

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
04th July, 11:45 pm
दोन विद्यार्थ्यांची हाणामारी पाहून विद्यार्थिनीला आली चक्कर...

डिचोली : येथील एका उच्च माध्यमिक विद्यालयाच्या दोन विद्यार्थ्यांमध्ये शाळा सुटल्यानंतर काही कारणांवरुन वादावादी व मारहाण झाल्याचा प्रकार घडला. एका विद्यार्थ्याने दुसऱ्या एका विद्यार्थ्याला जोरदार बुक्का मारला. त्याचवेळी हा प्रकार पाहिलेल्या एका विद्यार्थिनीला चक्कर आली.

डिचोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा प्रकार हायस्कूलच्या गेटच्या बाहेरच घडला. हायस्कूल सुटल्यानंतर या विद्यार्थ्यांमध्ये वादविवाद झाला. याच वादाचे गुरुवारी मारहाणीत पर्यावसान झाले. त्यात एका विद्यार्थ्याने दुसऱ्याच्या छातीवर पंच मारला. या प्रकरणानंतर शिक्षकांनीच रूग्णवाहिका बोलावून डिचोली सरकारी सामाजिक आरोग्य केंद्र इस्पितळात मुलांना नेले.

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात या मुलांना तपासल्यानंतर त्यांचा डिचोली पोलिसांकडून एनजीओंसमोर जबाब नोंदविण्यात आला. याबाबतचा अहवाल पोलिसांकडून बाल कल्याण सोसायटीला पाठविण्यात येणार असून त्यांच्या सुचनेनुसार पुढील पावले उचलण्यात येणार आहेत, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. 

हेही वाचा