गांधीनगरमध्ये अमित शहांचा बंपर विजय

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
05th June, 12:55 am
गांधीनगरमध्ये अमित शहांचा बंपर विजय

अहमदाबाद : भारतीय जनता पक्षाचे उमेदवार अमित शहा मतदारसंघातून विजयी झाले आहेत. अमित शहा यांना एकूण १० लाख १०९७२ मते मिळाली आहेत. काँग्रेसच्या सोनल पटेल २ लाख ६६,२५६ मतांसह दुसऱ्या क्रमांकावर आहेत. अमित शहा यांनी आपल्या विजयाचा जुना विक्रम मोडला आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत ते ५ लाख ५७,०१४ मतांच्या फरकाने विजयी झाले होते. यावेळी त्यांच्या विजयाचे अंतर ७ लाख ४४,७१६ इतके आहे. तिसऱ्या टप्प्यांतर्गत गांधीनगर लोकसभा जागेसाठी ७ मे रोजी मतदान झाले होते. गुजरातमधील गांधीनगर लोकसभा सीट नेहमीच हाय प्रोफाईल राहिली आहे. गेली ३५ वर्षे भाजपची सत्ता आहे. गांधीनगर हे भाजपच्या सर्वात सुरक्षित जागांमध्ये गणले जाते.

सोनल पटेल या २०१२ते २०१८ दरम्यान ६ वर्षे गुजरात महिला काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा होत्या. सध्या त्या अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सचिव आहेत. याशिवाय, त्या मुंबई आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काँग्रेसच्या सहप्रभारी आहेत. सोनल पटेल यांनी १९९२ मध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला. 

हेही वाचा