संजय दत्तशी संबंधित एक मोठी बातमी समोर येत आहे. अहमद खानच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेला ‘वेलकम : टू द जंगल’ संजय दत्तने अर्धवट सोडल्याचे बोलले जात आहे. अद्याप याला अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, परंतु सूत्राने त्यामागचे कारण निश्चितपणे सांगितले आहे. १५ दिवसांच्या शूटिंगनंतर संजय दत्तने चित्रपट सोडला आहे.
एका रिपोर्टनुसार संजय दत्तने तारीख आणि स्क्रिप्टमध्ये केलेले बदल यामुळे हा चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला आहे. चित्रपट सोडण्यापूर्वी संजय दत्त अक्षय कुमारशी बोलला होता, असे बोलले जात आहे. संजय दत्तने अनियोजित शूटिंग शेड्यूल आणि स्क्रिप्टमध्ये केलेले बदल याबद्दल अक्षयकडे निराशा व्यक्त केली आणि त्यानंतर चित्रपट सोडण्याचा निर्णय घेतला.
चित्रपट कधी प्रदर्शित होणार?
संजय दत्त आणि अक्षय कुमार यांच्याशिवाय 'वेलकम टू द जंगल'मध्ये जॅकलीन फर्नांडिस, दिशा पटानी, रवीना टंडन, लारा दत्ता, परेश रावल आणि सुनील शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट २०२४ च्या ख्रिसमसमध्ये रिलीज होणार आहे.