रंगतदार सामन्यात राजस्थानची बा​जी

पंजाबवर ३ गडी राखून विजय : यशस्वी जैसवालची फटकेबाजी

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
14th April, 12:46 am
रंगतदार सामन्यात राजस्थानची बा​जी

मोहाली : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने पंजाब किंग्जचा ३ गडी आणि १ चेंडू राखून पराभव केला. याचबरोबर यंदाच्या हंगामात गुणतालिकेत डबल दुहेरी अंक पटकावणारी (१० गुण) जाणारी राजस्थान ही पहिली टीम ठरली आहे.
पंजाब किंग्जने १४८ धावांचे माफक आव्हान घेऊन मैदानात उतलेल्या राजस्थान रॉयल्सची चांगल्या सुरूवातीनंतर गाडी घसरली. कगिसो रबाडाने राजस्थानला दोन धक्के दिल्यानंतर त्यांची मधली फळी ढेपाळली. त्यामुळे सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला.
अखेरच्या षटकात राजस्थानला विजयासाठी १० धावांची गरज असताना हेटमायरने अर्शदीपच्या षटकात दोन षटकार लगावत राजस्थानला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून यशस्वी जयस्वालने सर्वाधिक ३९ तर हेटमायरने २७ धावा केल्या. पंजाबकडून रबाडा आणि सॅम करनने प्रत्येकी २ बळी घेतले.प्रथम फलंदाजी करताना पंजाबने १४७ धावा केल्या होत्या. यादरम्यान आशुतोष शर्माने १६ चेंडूत ३१ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला. लिव्हिंगस्टोनने २१ धावा केल्या. जितेश शर्माने २४ चेंडूत २९ धावा केल्या. अथर्व आणि बेअरस्टो प्रत्येकी १५ धावा करून बाद झाले. राजस्थानकडून आवेश खान आणि केशव महाराज यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. बोल्ट, सेन आणि चहल यांनी प्रत्येकी एक बळी घेतला. पंजाबने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या राजस्थान संघाने १९.५ षटकांत ७ गडी गमावून सामना जिंकला. त्यासाठी हेटमायरने १० चेंडूत २७ धावा केल्या. त्याने ३ षटकार आणि १ चौकार लगावला.

चहलच्या नावावर नोंदवला नकोसा विक्रम
युजवेंद्र चहल आयपीएलच्या इतिहासातील दुसरा गोलंदाज बनला आहे, ज्याच्याविरुद्ध २०० षटकार मारले गेले आहेत. चहलने आयपीएलमधील आपल्या १५१ व्या सामन्यात हा नकोसा विक्रम केला. त्याने आयपीएलमध्ये एकूण ३३०५ चेंडू टाकले आहेत. ज्यामध्ये त्याच्याविरुद्ध २०० षटकार मारण्यात आले आहेत. चहलशिवाय पियुष चावलाविरुद्ध २०० हून अधिक षटकार मारले आहेत. त्याच्याविरुद्ध आयपीएलमध्ये एकूण २११ षटकार मारण्यात आले आहेत.

या गोलंदाजांविरुद्ध मारलेत सर्वाधिक षटकार
पियुष चावला – २११ षटकार
युजवेंद्र चहल – २०० षटकार
रवींद्र जडेजा – १९८ षटकार
आर अश्विन – १८९ षटकार
अमित मिश्रा – १८२ षटकार