मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा धूसर

दिल्लीकडून ५ धावांनी पराभव : जॅक फ्रेजर मॅकगर्कची तुफानी खेळी

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th April, 12:10 am
मुंबई इंडियन्सच्या प्लेऑफच्या आशा धूसर

दिल्ली : आयपीएलमधील ४३ वी मॅच दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात शनिवारी (२७ रोजी) खेळवण्यात आली. या मॅचमध्ये दिल्लीच्या फलंदाजांनी तुफानी फटकेबाजी करत मुंबई इंडियन्सच्या बॉलर्सला अक्षरश: घाम फोडला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबई इं​डियन्स विरुद्ध आयपीएलच्या इतिहासात सर्वोच्च स्कोअर सुद्धा नोंदवला. दिल्ली कॅपिटल्सचा ओपनर बॅट्समन जॅक फ्रेजर मॅकगर्क याच्या मदतीने टीमने २० षटकांमध्ये ४ बाद २५७ धावा केल्या. हे आव्हान गाठण्यासाठी मैदानात उतरलेल्या मुंबई इंडियन्सला पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे मुंबईच्या प्लेऑफला पोहोचण्याच्या आशाही धूसर झाल्या आहेत. 

मॅचच्या सुरुवातीला मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. यानंतर फलंदाजीसाठी मैदानात उतरलेल्या दिल्ली कॅपिटल्सची सलामी जोडी जॅक फ्रेजर मॅकगर्क आणि अभिषेक पोरेल यांनी चांगली भागीदारी करत मोठा स्कोअर उभा केला. अभिषेक ३६ धावा करून आऊट झाला. त्यानंतर आलेल्या शाई होप याने जॅक फ्रेजरला चांगली साथ देत ४१ धावा केल्या. ऋषभ पंतने २९ धावा, जॅक फ्रेजर मॅकगर्क याने ८४ धावांची इनिंग खेळली. तर स्टब्सने नॉट आऊट ४८ धावा आणि अक्षर पटेलने नॉट आऊट ११ धावा केल्या. मुंबई इंडियन्सच्या टीमकडून लूक वूड, जसप्रित बुमराह, पियुष चावला आणि मोहम्मद नबी या सर्वांनी प्रत्येकी एक-एक बळी घेतला.

 मुंबईची सुरुवातच खराब झाली. रोहित शर्मा केवळ ८ धावा करून माघारी परतला. त्यानंतर ईशान किशन सुद्धा २० धावा करून आऊट झाला. मग सूर्यकुमार यादव आणि तिलक वर्मा हे चांगली बॅटिंग करून टीमला सावरत होते. मात्र, सूर्यकुमार यादव सुद्धा २६ धावा करून माघारी परतला. यानंतर हार्दिक पांड्या याने टीमचा स्कोअर वाढवण्यास सुरुवात केली. मात्र, ४६ धावा करून पांड्या माघारी परतला. यानंतर तिलक वर्मा आणि टीम डेविड यांनी टीमला सावरत स्कोअर पुढे नेला आणि अटीतटीपर्यंत मॅच पोहोचली. मात्र, टीम डेविड ३७ धावा काढून आऊट झाला. दुसरीकडे तिलक वर्माने आपली तुफानी इनिंग सुरूच ठेवली. मात्र, तिलक रन आऊट झाला. त्याने ६३ धावांची इनिंग खेळली. अखेर मुंबई इंडियन्सचा १० धावांनी पराभव झाला. जेक फ्रेझर-मॅकगर्कने २७ चेंडूचा सामना करताना ११ चौकार आणि ६ षटकार मारत ८४ धावांची वादळी खेळी साकारली. त्याचबरोबर त्याने एक खास पराक्रम केला आहे. तो आयपीएलमध्ये १५ किंवा त्यापेक्षा कमी चेंडूत दोनदा अर्धशतक झळकावणार तिसरा फलंदाज ठरला आहे. त्याच्याआधी हा पराक्रम केकेआरच्या आंद्रे रसेल आणि सुनील नरेनने केला आहे.

हार्दिक पांड्या ऋषभ पंतवर भडकला

दिल्ली फलंदाजी करत असताना मुंबईच्या गोलंदाजांनी खूप मार खाल्ला. खुद्द कर्णधार हार्दिक पांड्याने दोन षटकात ४१ धावा दिल्या. मुंबईचे गोलंदाज मार खात असताना मैदानावर कायम हसत राहणारा हार्दिक पांड्या जाम भडकलेला दिसला. दिल्ली कॅपिटल्सने मुंबईविरूद्ध पॉवर प्लेमध्ये बिनबाद ९२ धावा ठोकल्यानंतर मुंबईने अखेर दिल्लीला पहिला धक्का दिला. २७ चेंडूत ८४ धावा ठोकणारा जॅक फ्रेजर मॅकगर्क बाद झाल्यावर ऋषभ पंत क्रीजवर आला. पंत आल्यानंतर गार्ड घेण्यासाठी वेळ लावत होता. त्यानंतर पांड्या जाम भडकला. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. पांड्या अंपायर्सकडे पंतच्या चेंडू खेळण्याबाबत दिरंगाई करत असल्याची तक्रार लाँग ऑनवरून करत होता.  पांड्या अंपायर्सना सांगत होता की पंत हे मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांचा रिदम ब्रेक करण्यासाठी मुद्दाम करत आहे. जॅकच्या हाणामारीने वैतागलेल्या पांड्याचा हा आक्रमक अवतार पाहून चाहत्यांना देखील आश्चर्य वाटले असेल.

दिल्ली कॅपिटल्ससाठी सर्वांत वेगवान अर्धशतक

१५ चेंडू - जॅक फ्रेझर-मॅकगर्क, विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०२४

१५ चेंडू - जॅक फ्रेझर-मॅकगर्क, विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, २०२४

१७ चेंडू - ख्रिस मॉरिस, विरुद्ध गुजरात लायन्स, २०१६

१८ चेंडू - ऋषभ पंत, विरुद्ध मुंबई इंडियन्स, २०१९

आयपीएलमध्ये प्रतिस्पर्ध्याच्या सर्वाधिक धावा

४८१  मुंबई विरुद्ध​ दिल्ली,   २०२४ (२३४/५ आणि २४७/९)

४६८  बेंगळूरू विरुद्ध हैदराबाद,   २०२४ (२६२/७ आणि २०६/७)

४६२  दिल्ली विरुद्ध मुंबई,   २०२४ (२०५/८ आणि २५७/४)

४५८  हैदराबाद विरुद्ध बेंगळूरू,   २०२४ (२८७/३ आणि १७१/८)

४५०  बेंगळूरू विरुद्ध पुणे,   २०१३ (२६३/५ आणि १८७/३)

आयपीएलमध्ये मुंबईची सर्वोच्च धावसंख्या 

२४७/९ विरुद्ध दिल्ली,         २०२४ (पराभव)

२४६/५ विरुद्ध हैदराबाद, २०२४ (पराभव)

२३५/९ विरुद्ध हैदराबाद, २०२१ (विजयी)

२३४/५ विरुद्ध दिल्ली,         २०२४ (विजयी)

२२३/५ विरुद्ध पंजाब किंग्स, २०१९ (पराभव)