रेंजर्सने जिंकला अल्कॉन जीएसबी युनिटी चषक

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
05th May, 11:50 pm
रेंजर्सने जिंकला अल्कॉन जीएसबी युनिटी चषक

पणजी : रेंजर्सने मडगाव रॉयल्सचा अंतिम सामन्यात १७ धावांनी पराभव करत अल्कॉन जीएसबी युनिटी चषक टी-२० क्रिकेट स्पर्धेचे विजेतेपद पटकावले. गोवा जीएसबी स्पोर्टस् अँड चॅरिटेबल ट्रस्ट यांनी गोवा सारस्वत समाज यांच्या सहकार्याने पणजी जिमखाना, मडगाव क्रिकेट क्लब व एसके ग्राऊंड मळकर्णे या तीन ठिकाणी या स्पर्धेतील सामन्यांचे आयोजन केेले होते. 

मडगावच्या एमसीसी मैदानावर झालेल्या अंतिम सामन्यात रेंजर्सने निर्धारित २० षटकांत ९ बाद १७७ धावा केल्या. यानंतर त्यांनी मडगाव रॉयल्सचा डाव १९.३ षटकांत १६० धावांत संपवला. 

स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे म्हमून आल्कॉन समुहाचे संचालक आकाश खंवटे (अनिल खंवटे एंटरप्राईझ) उपस्थित होते. याव्यतिरिक्त ट्रस्टचे अध्यक्ष सिद्धीत रायतुरकर, एमसीसी व गोवा क्रिकेट असोसिएशनचे व्यवस्थापकीय समिती सदस्य आदित्य आंगले, बीसीसीआय पॅनल पंच नितीन पै, मडगाव नगरपालिकेचे नगरसेवक दादा नाईक, शामराव बिल्डर्सचे संचालक प्रथमेश सुखठणकर, कुडचडेचे माजी नगराध्यक्ष व विद्यमान नगरसेवक बाळकृष्ण होडारकर, एमसीसी अध्यक्ष व एसआरई समुहाचे व्यवस्थापकीय भागीदार योगेश नाईक तसेच ट्रस्टचे सदस्य व क्रिकेटप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.