सदानंद वायंगणकर यांना अटक

निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी कारवाई

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 12:10 am
सदानंद वायंगणकर यांना अटक

मडगाव : दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात ईव्हीएम मशिनमध्ये चिन्हे लोड करण्याचे काम सुरू आहे. ‘करप्शन अबोलिशन पार्टी’चे सदानंद वायंगणकर यांनी मॅन्युएलविना व योग्य पद्धत न वापरता चिन्हे घातली जात असून निवडणूक आयोगाच्या निर्देशाचे पालन केले जात नसल्याचे सांगत या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. 

जिल्हाधिकारी  तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अश्विन चंद्रू यांच्या आदेशानंतर फातोर्डा पोलिसांकडून निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी सदानंद वायंगणकर यांना अटक करण्यात आली.

सासष्टी तालुक्यातील चार विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएममध्ये चिन्हे लोडिंग युनिटमध्ये चिन्ह लोड करण्याची प्रक्रिया रविवारी दिवसभर चालली व रात्री उशिरा अवघ्या मॉक पोलिंगची प्रक्रिया संपली. सासष्टीच्या उर्वरित चार मतदारसंघांतील ईव्हीएमच्या युनिटमध्ये उमेदवारांची चिन्हे लोड करण्यासाठी सोमवारी सकाळी सुरुवात झाली. 

सदानंद वायंगणकर हे प्रतिनिधी म्हणून दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. त्यांनी या प्रक्रियेवर आक्षेप घेतला. दरम्यान, फातोर्डा पोलिसांनी निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी वायंगणकर यांना अटक केली.


हेही वाचा