डिचोलीत ७२ ज्येष्ठ, दिव्यांगांनी केले मतदान

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
30th April, 12:12 am
डिचोलीत ७२ ज्येष्ठ,  दिव्यांगांनी केले मतदान

मतदानाचा हक्क बजावताना ज्येष्ठ महिला. सोबत निवडणूक अधिकारी.

डिचोली : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ८५ वर्षे वय पार केलेले ज्येष्ठ  नागरिक तसेच शारीरिकदृष्ट्या दिव्यांग असलेल्या व्यक्तींना घरी मतदानाचा हक्क बजावण्याची विशेष संधी निवडणूक आयोगाने दिली. सोमवारी 

डिचोली तालुक्यात ७२ जणांनी मतदानाचा हक्क बजावला, अशी माहिती डिचोलीचे निवडणूक अधिकारी रमेश गावकर यांनी दिली.

साखळी मतदारसंघातील ६८ ज्येष्ठ नागरिकांपैकी २२ जणांनी तसेच ५० दिव्यांगांपैकी १३ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. मयेतील ७४ ज्येष्ठ नागरिकांपैकी २३ जणांनी, तर ४५ दिव्यांगांपैकी १४ जणांनी मतदानाचा हक्क बजावला. निवडणूक आयोगाने ही संधी घरीच उपलब्ध करून दिल्याने ज्येष्ठ नागरिक तसेच दिव्यांग मतदारांनी आनंद व्यक्त केला. एक विशेष टीम पाठवून ही प्रक्रिया राबविण्यात आली.

हेही वाचा