पुढील आठड्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही

हवामान खात्याची माहिती : हिट इंडेक्स ४० ते ५० अंश राहण्याची शक्यता

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
13th April, 12:15 am
पुढील आठड्यापर्यंत उष्णतेच्या लाटेची शक्यता नाही

पणजी : हवामान खात्याने पुढील सात दिवस कमाल तापमान ३३ ते ३५ अंश सेल्सिअस राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. या कालावधीत राज्यात उष्णतेच्या लाटेची शक्यता नसल्याचेही खात्याने स्पष्ट केले आहे. असे असले तरी राज्याती ‘हीट इंडेक्स‘ म्हणजे व्यक्तीला जाणवणारे तापमान ४० ते ५० अंश असण्याची शक्यता खात्याने वर्तवली आहे.
‘हीट इंडेक्स‘ चे मोजमाप करताना तापमान, सापेक्ष आर्द्रता व अन्य वातावरणीय घटकांचा अभ्यास केला जातो. तापमान कमी असले तरी या घटकांमुळे व्यक्तिला ते जास्त जाणवते. हवामान खात्यातर्फे मागील वर्षापासून ‘हीट इंडेक्स‘ची माहिती देणे सुरू केले आहे. हा केवळ उन्हाळ्याच्या चार महिन्यांच्या कालावधीसाठी दिला जातो.
दरम्यान शुक्रवारी पणजी येथे कमाल ३३.५ अंश व किमान २४.५ अंश सेल्सियस तामानाची नोंद झाली.तर मुरगाव येथे कमाल ३३.८ अंश सेल्सियस होते. १३ रोजी वाऱ्याचा वेग ताशी ४५ ते ५५ किमी पर्यंत पोहचण्यची शक्यता असल्याने मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये, असे आवाहन खात्याने केले आहे.                    

हेही वाचा